कुडाळ :
कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात 30 मार्च रोजी गुढीपाडवा ते 8 एप्रिल या कालावधीत श्री रामनवमी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव कालावधीत रोज सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत श्रींच्या पाषाण मूर्तीवर लघुरुद्र, अभिषेक, सायंकाळी 7 वाजता आरती व मंत्रपुष्पांजली ,रात्री 8 वाजता पुराण वाचन, 8. 45 वाजता श्रींची पालखी मिरवणूक ,10 वाजता श्री च्या उत्सव मूर्तीचे आगमन, 10-15 वाजता कीर्तन व आरती असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच 30 मार्च रोजी गुढीपाडवा – दुपारी 12 वाजता गुढीरोहण, पूजन, नववर्षफलवाचन, सायंकाळी 4.30 वाजता वालावलकर दशावता मंडळाचे दिनांची माऊली नाटक, रात्री 10.15 वाजता कीर्तनकार विश्वनाथ उर्फ भाऊ नाईक यांचे कीर्तन, 31 रोजी सायंकाळी 4.30 वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेदवणकर दशावतार मंडळाचे दोन आत्म्यांचे लग्न नाटक, रात्री 10.15 वाजता कीर्तनकार स्नेहलदीप सामंत यांचे कीर्तन, 1 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता दत्तमाऊली दशावतार मंडळाचे पिठजा देवी नाटक, रात्री 10.15 वाजता कीर्तनकार अवधूत धूपकर यांचे कीर्तन, 2 रोजी सायंकाळी 4.30 वाजता बाबी कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार मंडळाचे विधी संकेत नाटक, रात्री 10.15 वाजता अवधूत धूपकर यांचे कीर्तन, 3 रोजी चेदवणकर – गोरे दशावतार मंडळाचे साक्षात्कार – गणेश महिमा नाटक, रात्री 10.15 वाजता कीर्तकार रामचंद्रबुवा उर्फ काका मेस्त्री यांचे कीर्तन, 4 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री देव कुडाळेश्वर महिला मंडळ आयोजित जल्लोष नृत्याचा कार्यक्रम, रात्री 10.15 वाजता कीर्तनकार मकरंद देसाई यांचे कीर्तन, 5 रोजी सायंकाळी 4.30 वाजता संकल्प क्रिएशन अंतर्गत कुडाळेश्वर महिला दशावतार मंडळाचे कांचनगंगा नाटक, रात्री 10.15 वाजता कीर्तनकार प्रशांत धोंड यांचे कीर्तन ,6 रोजी श्री रामनवमी (रामजन्म सोहळा ) सकाळी 7 वाजता लघुरुद्र (सर्व ग्रामस्थांच्यावतीने ) ,भक्ती संगीत ( सतीश कुंटे.) ,10 वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीचे आगमन, पुराण वाचन, प्रशांत धोंड बुवा यांचे श्री रामजन्म किर्तन, दुपारी 12.15 वाजता श्री रामजन्म व प्रसाद (सुंठवडा ) आणि श्रींची पालखी मिरवणूक, सायंकाळी 4.30 वाजता वावळेश्वर दशावतार मंडळाचे ट्रिकसिनयुक्त अयोध्याधीश श्रीराम नाटक,रात्री 9 वाजता श्रीची पालखी मिरवणूक, 10:30 वाजता श्री देव कुडाळेश्वर मित्रमंडळ आयोजित एक नाटिका, रात्री 12.30 वाजता पार्सेकर दशावतार मंडळ ( वेंगुर्ले ) यांचे दंभ गरुडाक्ष फणेद्र भक्ष, 7 रोजी 4.30 वाजता संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी ( कुडाळ ) प्रस्तुत नृत्यरंग कार्यक्रम, रात्री 9.45 वाजता भाऊ नाईक यांचे कीर्तन, 8 रोजी एकादशी श्री राम राज्याभिषेक- सकाळी 10 वाजता पट्टाअभिषेक, नवग्रह शांती ,सप्तसिंधू जलकुंभधारी तसेच श्री हनुमंत रांगोळी चित्र प्रतिमेचे पूजन, दुपारी 3 वाजता श्रींची पालखी मिरवणूक, सायंकाळी 4.30 वाजता पार्सेकर दशावतार मंडळाचे महावीर बर्बरीक नाटक, रात्री 8.45 वाजता श्रींची पालखी मिरवणूक ,9. 45 वाजता भाऊ नाईक यांचे लळीत कीर्तन, 11:30 वाजता निमंत्रितांचे ग्रुप डान्स – डान्सिंग नाईट कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव कुडाळेश्वर – श्रीरामनवमी महोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.