सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ मार्च रोजी यलो अलर्ट देण्यात आलेला असून या कालावधीत जिल्ह्यात गडगडाटसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची व वीज चमकण्याची व ताशी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी कळविले आहे. तसेच ३० मार्च ते १ एप्रिल २०२५ या कालावधीत जिल्ह्यात गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२) २२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करा, असे आवाहन केले आहे.