_*ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी चमकले….*_
_*चार गोल्ड, एक सिल्व्हर व चार ब्रॉन्झ पदकांसह १००% निकाल….*_
_ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सुयश प्राप्त केले. परीक्षेला शाळेतून शंभर विद्यार्थी बसले होते आणि सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. यामध्ये इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी सान्वी संतोष पोरे हिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला._
_शाळेच्या हर्ष संजय गावडे (पहिली), सान्वी संतोष पोरे (दुसरी), मानस विजय परब (दुसरी)आणि वेदा प्रवीण राऊळ (सहावी) यांनी गोल्ड मेडल मिळवले. प्रिश रवी गोलघाटे (तिसरी) याने सिल्वर तर ओजस सचिन पालकर (दुसरी), धवल मंदार ठाकूर (दुसरी) अर्णव राहुल शेवाळे (तिसरी) आणि समृद्धी राजेंद्र कुलांगे (सातवी)यांनी ब्राँझ मेडल मिळवले._
_सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक आणि मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले._