You are currently viewing कुडाळात उद्या आणि परवा रोंबाट, राधानृत्य व चित्ररथ स्पर्धा – काका कुडाळकर

कुडाळात उद्या आणि परवा रोंबाट, राधानृत्य व चित्ररथ स्पर्धा – काका कुडाळकर

कुडाळात उद्या आणि परवा रोंबाट, राधानृत्य व चित्ररथ स्पर्धा – काका कुडाळकर

निलेश राणेंच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ…

कुडाळ

महायुतीच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून उद्या आणि परवा कुडाळ येथे भव्य रोंबाट, राधानृत्य आणि चित्ररथ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान गुढी पाडव्याला काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत गोव्यातले भव्य देखावे चित्ररथाच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. कुडाळ तहसील नजिकच्या मैदानावर हा शिमगोत्सव सोहळा होणार आहे.

कुडाळ येथील महायुतीच्या कार्यालयात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. कुडाळकर बोलत होते. यावेळी शिवसेना नेते संजय पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर आदि उपस्थित होते.

यावेळी श्री.कुडाळकर म्हणाले की, आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथील शिमगोत्सव कार्यक्रम भव्य दिव्य असा होणार आहे. उद्या सायं.७ वाजता या महोत्सव कार्यक्रमाचा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ होणार आहे.

३० मार्चला कुडाळ शहरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत गोव्यातील खास ४ आकर्षक देखावे दाखल होणार आहेत. शोभा यात्रेची सुरुवात कुडाळ कॉलेज चौक-पोलीस स्टेशन-जिजामाता चौक-गांधी चौक ते गुलमोहर हॉटेलपर्यंत होणार आहे. कुडाळ जिजामाता चौक येथे या रॅलीमध्ये आमदार निलेश राणे स्वतः सहभागी होणार आहेत. या महोत्सवात अधिकाधिक राधा नृत्य सादर केली जातील, अशी माहिती श्री. कुडाळकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा