You are currently viewing स्व.रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशनची स्थापना

स्व.रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशनची स्थापना

स्व.रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशनची स्थापना

दि.29 ला पुणे येथे रितसर उद्घाटन

अनेक मान्यवरांची उपस्थिती

पुणे

माजी राष्ट्रपती महामहीम श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात त्यांचे स्विय सहाय्यक म्हणून ज्यांनी पाच वर्षं राष्ट्रपती भवनात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्य केले, तसेच अमरावती येथे जिल्हाधिकारी म्हणून ज्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले, नाशिक जिल्ह्याचे विभागीय आयुक्त म्हणून ज्यांनी कुंभ मेळ्याचे उत्कृष्ट आयोजन केले, पुणे येथे राज्य माहिती आयुक्त असताना त्यांनी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असे सर्वांनाच आवडणारे श्री रवींद्र जाधवसाहेब आपल्याला परीचीत आहेतच. यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वर अतोनात प्रेम असणाऱ्या सर्व आप्त जनांनी, मित्र मंडळीने रवींद्र जाधव ग्लोबल फाऊंडेशनची स्थापना येत्या शनिवारी दिनांक 29 मार्च 2025 रोजी सायंकाळी चार आयोजित केली आहे. हा कार्यक्रम पुण्याच्या बाणेर विभागातील बीबीसी टॉवरमध्ये संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला पद्मविभूषण पुरस्कार विजेते डॉ कांतीलाल संचेती व पुणे विभागीय आयुक्त श्री डॉ चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पुणे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी(भा.प्र.से.), त्यांच्या पत्नी कमांडंट सी.आर.पी.फ. ग्रुप १, श्रीमती अंचल दलाल (भा.पो.से.), सातारा जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील (भा.प्र.से.), पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री शेखर सिंह, (भा.प्र.से.), वेकफील्ड कंपनी चे कार्यकारी संचालक श्री मुकेश मल्होत्रा, महाराष्ट्राचे माजी ॲडीशनल डायरेक्टर जनरल श्री टीकमचंद एस.भाल(भा.पो.से.), माजी विभागीय आयुक्त औरंगाबाद डॉ पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से.), माजी कार्यकारी संचालक म्हाडा श्री अरूण डोंगरे(भा.प्र.से.), पुणे झोन १ चे पोलिस उपायुक्त श्री संदीप सिंग गिल,छ.संभाजी नगर चे माजी खासदार श्री उत्तम सिंह पवार, माजी क्रुषी आयुक्त श्री उमाकांत दांगट(भा.प्र.से.), माजी आदीवासी आयुक्त श्री संभाजी सरकुंडे(भा.प्र.से.), नेत्रतज्ज्ञ डॉ संदीप डोळे, श्रीमती ज्योती राठौर, श्री जयेश राठौर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

श्री रवींद्र जाधव साहेब यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेल्या स्व.रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशनच्या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातुन त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक श्री विरेंद्र सिंह बोराडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाअन्वये केले आहे.
================
प्रकाशनार्थ
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आय ए एस अमरावती कॅम्प
9890967003

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓

*_डी जी बांदेकर ट्रस्ट मध्ये ऍडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा…._*

सावंतवाडीतील प्रसिद्ध डी.जी. बांदेकर ट्रस्ट घेऊन आले आहेत कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या भवितव्यासाठी आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस.. आणि *एक वर्ष फाउंडेशन कोर्स*

_होय… आता चित्रकला शिकण्यासाठी मुंबई पुण्यात जाण्याची गरज नाही…_

_आमच्या संस्थेत या आणि बदलत्या शिक्षणा प्रकारासोबत नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना शिका._

_मुंबई विद्यापीठाचे चार वर्ष डिग्री कोर्स साठी लागणाऱ्या सीईटी परीक्षेविषयी पूर्वकल्पना व सराव होण्याच्या दृष्टीने एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स_

_यु,आय, यु एक्स सॉफ्टवेअर, ग्राफिक डिझाईन, क्राफ्ट, कॅलिग्राफी, टायपोग्राफी, डुडलिंग,क्ले मॉडलिंग ॲनिमेशन इत्यादी गोष्टी विषय मूलभूत माहिती संधी…_

_👉विशेष म्हणजे फाउंडेशन कोर्स साठी कोणत्याही सीईटी परीक्षेची गरज नाही._

_शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी_
_प्रवेश प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू…_
तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी दर शनिवार आणि रविवार *आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस*

*(वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेची अट नाही)*

_चला तर मग कोर्ससाठी प्रवेश घ्या आणि छंदासोबत कलेची आवड जोपासा…_

*अधिक माहितीसाठी*👇

*तुकाराम मोरजकर*
*📲9405830288*

*सिद्धेश नेरुरकर*
*📲9420260903*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा