You are currently viewing इन्सुली घाटीत ब्रेक फेल झाल्याने एसटीला अपघात

इन्सुली घाटीत ब्रेक फेल झाल्याने एसटीला अपघात

*इन्सुली घाटीत ब्रेक फेल झाल्याने एसटीला अपघात*

*प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दुखापत; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविले*

*सावंतवाडी*

कुडाळ येथून पणजी येथे जाणाऱ्या एसटी बसला इन्सुली घाटीत अपघात झाला. गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून गाडी डोंगराच्या दिशेने उंच भागात वळवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात गाडीतील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यात काही महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. दुपारी ३.३० च्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा