यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा 2025; 30 मार्च रोजी जाहीर होणार निकाल
सावंतवाडी :
कोकणातील संत शिरोमणी साटम महाराजांच्या पुण्यतिथी दिनाच्या औचित्याने संदीप गावडे फाउंडेशनच्या वतीने १६ मार्च २०२५ रोजी तालुकास्तरीय यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 30 मार्च 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल खालील लिंकवर ऑनलाइन पाहता येईल: https://bit.ly/yashwant
सदर लिंक दुपारी ३ वाजल्यानंतर सुरू होईल.
ही शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा तालुक्यातील सात केंद्रांवर घेण्यात आली होती – माडखोल केंद्र शाळा, सांगेली केंद्र शाळा,आंबोली सैनिक स्कूल, मळेवाड शाळा नंबर १,मळेवाड शाळा नंबर २,सावंतवाडी कळसुलकर हायस्कूल, बांदा केंद्र शाळा. या परीक्षेत एकूण 580 विद्यार्थी सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांना फेरतपासणीसाठीही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
https://forms.gle/7eACP5D3bEydX4WD7
विद्यार्थ्यांनी वेळेत निकाल तपासून घ्यावा आणि आवश्यक असल्यास फेरतपासणीसाठी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.