सावंतवाडी तालुका अंतर्गत कुठेही अपघात झाल्यास लगेचच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची संपर्क साधा-रवी जाधव.
सावंतवाडी
सध्या स्थितीमध्ये या धावपळीच्या जीवनात अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. एक्सीडेंट झाल्यावर रस्त्याच्या कडेला अपघात ग्रस्त तळमळत असताना काही जण भीतीपोटी अपघात ग्रस्त व्यक्तीला हात लावण्यास घाबरतात तेव्हा ते 108 किंवा पोलिसांची संपर्क साधतात. हे योग्यच आहे परंतु अशावेळी पोलीस किंवा 108 ला संपर्क न झाल्यास आपण सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी संपर्क साधू शकतात अपघात ग्रस्त व्यक्तीला संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य व तत्काळ सेवा दिली जाईल आमचे नंबर आपल्या मोबाईल मध्ये फीड करून ठेवावे 9405264027/9423304674/9422633971
असे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवि जाधव यांनी केले आहे.
कालच्या अपघातात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने युद्ध पातळीवर मदत कार्य करून अपघातग्रस्तांचे प्राण वाचवले होते तर आज सकाळी सुद्धा इन्सुली येथील अक्षय गावडे वय वर्ष 44 या तरुणाचा अपघात सकाळी सहा वाजता शिरोडा नाका येथे झाला होता याची माहिती सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरस्कर यांनी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना दिली असता रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी अन्नपूर्णा कोरगावकर यांची शहरांतर्गत विनामूल्य सेवा असलेली ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झाले व सदर अपघात ग्रस्ताला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर आता प्राथमिक उपचार सुरू आहे. निशांत तोरस्कर यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक केले.