You are currently viewing देवगड जामसंडे नगरपंचायतीचे १४.९६ लाखाचे वीजबिल थकीत

देवगड जामसंडे नगरपंचायतीचे १४.९६ लाखाचे वीजबिल थकीत

महावितरणाकडून प्रशासनाबरोबरच सर्व नगरसेवकांनाही नोटीस

देवगड :

देवगड जामसंडे न.पं.चे १४.९६ लाख रकमेच्या थकीत वीजबीलाची नोटीस प्रशासनाबरोबरच सर्व नगरसेवकांनाही देण्यात आल्याने संतप्त झालेल्या नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती सौ.प्रणाली माने यांनी सभेत प्रशासनालाच धारेवर धरले.ज्या नागरिकांकडून वीज कर घेतला जातो त्या नागरिकांना वीज समस्या उद्भवू नये याची काळजी घ्या व प्रथम थकीत वीजबील रक्कम त्वरीत भरणा करा अशा सुचना त्यांनी सभेत केल्या. देवगड जामसंडे न.पं.ची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेला उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत, मुख्याधिकारी सुरज कांबळे, पाणीपुरवठा सभापती सौ.प्रणाली माने, स्वच्छता सभापती सौ.आद्या गुमास्ते, बांधकाम सभापती शरद ठुकरूल उपस्थित होते.

महावितरण कार्यालयाकडून वीजबील थकबाकी बाबत न.पं.प्रशासनाला नोटीस पाठविण्यात आली आहे.या नोटीसीची प्रत सर्व नगरसेवकांनाही पाठविण्यात आली आहे.याचा उहापोह पाणीपुरवठा सभापती सौ.माने यांनी भर सभेत करून प्रशासनाला नोटीस देण्याबरोबरच नगरसेवकांनाही त्याची प्रत दिली जाते यावरून त्या संतप्त झाल्या.

थकीत वीजबीलापोटी शहर अंधारात ठेवू नका.शहरातील नागरिकांकडून घरपट्टीमधूनच वीजकर घेतला जातो.यामुळे थकीत वीजबील रक्कम त्वरीत भरणा करा अशी सुचना सौ.माने यांनी केली.जनतेची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या असेही सौ.माने यांनी यावेळी सांगीतले.स्वनीधी हा पाणी व समावेशित न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होतो यामुळे स्वनीधी शिल्लक राहत नाही असे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी यावेळी सांगीतले.यावर सौ.माने यांनी एवढे वीजबील थकीत का राहीले.आपण नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी, वीज कर, कचरा कर घेतो असे सांगीतले.त्यामुळे प्रशासनाने थकीत वीजबील प्रथम भरणा करावे असे सुचित केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा