डी. जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडी यांच्या मार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘फाऊंडेशन कोर्स इन आर्ट’ च्या दुसर्या वार्षिक कलाप्रदर्शन ‘कसब – २०२५’ चे आयोजन.
सावंतवाडी
येथील डी. जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडी यांच्या मार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘ फाऊंडेशन कोर्स इन आर्ट’ च्या दुसर्या वार्षिक कलाप्रदर्शन ‘कसब – २०२५’ चे उद्घाटन शनिवार दिनांक २९ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आर.पी.डी. हायस्कुल, सावंतवाडी येथे होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून मा. तहसीलदार श्री. श्रीधर पाटील, सावंतवाडी उपस्थित राहणार आहेत. सदर कला प्रदर्शन दिनांक २९ व ३०मार्च २०२५ या कालावधीत सकाळी १०.०० ते सायं. ०८.०० पर्यंत आर.पी.डी. हायस्कुल, सावंतवाडी येथे सर्व कलारसिकांसाठी खुले राहील. तसेच दिनांक २९/०३/२०२५ रोजी सायं. ४.०० वाजता बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ ़फाईन आर्ट चे प्राध्यापक व प्रसिध्द सुलेखनकार श्री. सिध्देश नेरुरकर यांचा कॅलिग्राफी वर्कशॉप आयोजीत करण्यात आला आहे. तरी सर्व कलारसिकांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन डी. जी.बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. गोविंद बांदेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी : श्री. तुकाराम मोरजकर :९४०५८३०२८८