You are currently viewing ट्रक व रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक बसून अपघात….

ट्रक व रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक बसून अपघात….

ट्रक व रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक बसून अपघात….

वैभववाडी

ट्रक व रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक गणपत काशीराम धावडे (वय ५८, रा. करुळ- भोयडेवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर संतोष रामकृष्ण माळकर (४८, रा. करुळ) हे किरकोळ जखमी झाले आहेत.ही घटना तळेरे – कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर एडगांव घाडीवाडी नजीक बुधवारी सायं. ५ वा. घडली. जखमींना सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी वैभववाडी पोलिस अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे. वैभववाडीहून करुळकडे रिक्षा घेऊन चालक गणपत धावडे जात होते. तर अक कोल्हापूरहून वैभववाडीच्या दिशेने येत होता. या दोन्ही वाहनांची धडक झाली.या धडकेत धावडे व रिक्षात बसलेले माळकर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी दोघांनाही वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात हलवले. प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांनाही तात्काळ सिंधुदुर्गनगरी येथे हलविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा