यंगस्टार मंडळाची प्रकाश झोतात खेळवली जाणारी कबड्डी स्पर्धा १८ एप्रिलपासून
कणकवली
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने यंगस्टार मित्रमंडळाच्यावतीने १८ ते २० एप्रिल या कालावधीत नगरपंचायतीच्या बॅडमिंटन काेर्ट येथे राज्यस्तरीय पुरुष गट निमंत्रित संघांची व जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेकरिता अनुक्रमे ५०,०२९ रु., २५,०२९ रु. व यंगस्टार चषक, ५०२९ रु., ५०२९ रु. अशी बक्षिसे आहेत. याशिवाय अष्टपैलू खेळाडू २,५२९ रु., उत्कृष्ट पकड १,५२९ रु., चढाई १,५२९ रु., शिस्तबद्ध संघ २,५२९ रु. व यंगस्टार चषक, अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षीसे आहेत. जिल्हास्तरीय महिला कबड्डीसाठी अनुक्रमे ७,००० रु., ५,००० रु. व यंगस्टार चषक अशी बक्षीसे आहेत. अष्टपैलू खेळाडू २,००० रु., उत्कृष्ट पकड १,००० रु., चढाई १,००० रु., शिस्तबद्ध संघ १,५०० रु. आणि यंगस्टार चषक अशी बक्षीसे आहेत. यंगस्टार मित्रमंडळ गेली २८ वर्षे कबड्डी स्पर्धा भरवित आहे. यंदाचे २९ वर्ष आहे. ही स्पर्धा प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.