कुणाल कामरावर गुन्हा दाखल करा…
युवा सेनेचे सावंतवाडी पोलिसांना निवेदन
सावंतवाडी
शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका टिपण्णी आणि बदनामी करणाऱ्या कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन युवा सेने तर्फे सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुणाल कामराच्या वक्तव्याचा निषेध करत यापुढे आमच्या नेत्यावर तसेच पक्षावर कोणी करत असेल तर युवासेनेकडून जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, युवासेना तालुका प्रमुख प्रतीक बांदेकर, गजानन नाटेकर, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष अर्चित पोकळे, युवासेना शहरप्रमुख निखिल सावंत,
मुकेश ठाकूर, राजन रेडकर, उपतालुक प्रमुख वर्धन पोकळे, क्लटस फर्नांडिस, पवन पाटील, रोहित पोकळे,
साईश वाडकर, मंदार सावंत, बबलो राऊळ, संदीप जंगले आदी युवा सेनेचे पदाधिकारी आणि युवासैनिक उपस्थित होते.