सामंत ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजूंना आर्थिक मदत…
सावंतवाडी
मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. डॉ. परूळेकर नर्सिंग होम मध्ये हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले.
यात सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले संस्थेत शिकणाऱ्या पेंडूर येथील साहिल गावडे, शंकरराव गव्हाणकर काॅलेजमध्ये शिकणाऱ्या सुधीर पवार आणि अल्पिता शेडगे, मुत्राशयाच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या आंबेगाव येथील शीतल शेळके, अन्ननलिकेच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या तेर्सेबांबार्डे येथील विशाखा सावंत, रक्तदाब आणि मुत्राशयाच्या आजाराने त्रस्त असलेल्या निगुडे येथील शशिकांत निगुडकर, जन्मजात अपंगत्व असलेल्या असनिये येथील श्रीधर सावंत यांच्या मुलासाठी, रक्तदाब आणि मधुमेह या आजाराने त्रस्त असनिये येथील पार्वती सावंत, जन्मजात व्यंग असलेल्या असनिये येथील दत्ता पोकळे यांच्या मुलासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी बांदा येथील प्रियांका मांजरेकर, किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या कारिवडे येथील यशवंत लाड अशा ११ जणांना हे धनादेश देण्यात आले आहेत.