केसरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व!
संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली ‘अटल परिवर्तन पॅनेल’चा बिनविरोध विजय!
सावंतवाडी
तालुक्यातील केसरी विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. केसरी येथील २०२५-३० संचालक मंडळ निवडणुकीत भाजप प्रणीत ‘अटल परिवर्तन पॅनेल’ ने बिनविरोध विजय मिळवला आहे. श्री. संदीप एकनाथ गावडे यांच्या नेतृत्वाखालील या पॅनेलने सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
नवनिर्वाचित संचालक मंडळ:
अ.क्र. नाव प्रवर्ग
1 श्री. लक्ष्मण सखाराम माळकर, सातुळी खुला
2 श्री. सुर्यकांत विठू परब, बावळाट खुला
3 श्री. दिप्तेश सुधाकर सुकी, सातुळी बाजार खुला
4 श्री. सिताराम अशोक सावंत, केसरी खुला
5 श्री. वासुदेव सिताराम सावंत, केसरी खुला
6 श्री. राजेंद्र झिलू सावंत, केसरी खुला
7 श्री. लक्ष्मण देवू पाटील, केसरी खुला
8 श्री. जानु देऊ पाटील, केसरी खुला
9 सौ. रेवती हरिश्चंद्र सावंत, केसरी महिला
10 सौ. दिपा दिलीप सुकी, केसरी महिला
11 श्री. उत्तम भाऊ नाईक, फणसवडे इतर मागास
12 श्री. तागु विठू वरक, केसरी भटके विमुक्त
13 श्री. श्रीधर आत्माराम कासले, केसरी अनुसूचित जाती
– भाजपाचा मोठा विजय
या निवडणुकीत भाजपच्या ‘अटल परिवर्तन पॅनेल’ने एकतर्फी विजय मिळवत विरोधकांना कोणतीही संधी दिली नाही. बिनविरोध निवड झाल्यामुळे दाणोली पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण आहे.