न्हावेलीतील वीज वाहिन्यांवरील झाडी पावसाळ्यापूर्वी साफ करणे संदर्भात महावितरणला निवेदन सादर…
सावंतवाडी
वीज वाहिन्यांवर झाडी वाढल्यामुळे न्हावेली गावात वारंवार वीज खंडीत होत आहे. त्यामुळे योग्य ती उपाययोजना करा, अशी मागणी न्हावेली येथील ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी वीज वितरण कंपनीकडे केली आहे.
याबाबत त्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, वीज वाहिन्यांवर झाडी असल्यामुळे काल झालेल्या वाऱ्यामुळे झाडांवरील लाईन तुटून न्हावेली-टेंबवाडी येथे पडली. त्यामुळे त्याचा फटक्यामुळे टेंबवाडीतील ग्रामस्थांना रात्रभर अंधारात राहावे लागले. पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी विद्युत प्रवाहाला अडथळा करणारी झाडे न तोडल्याने व विद्युत तारा सुरळीत नसल्यामुळे तसेच शॉट सर्किटमुळे वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे विजेचा लपंडाव सुरुच आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी वीज वाहिन्यांवरील झाडी मोठ्या पावसाळ्याआधी साफ करावे, अन्यथा महावितरणच्या कार्यालयात येऊन आंदोलन करू, असा इशारा यावेळी उपसरपंच श्री.पार्सेकर यांनी दिला आहे. यावेळी राज धवन, प्रथमेश नाईक, ओम पार्सेकर, निलेश परब उपस्थित होते.