You are currently viewing भाजपाच्या वतीने वेंगुर्लेत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परिक्षेत प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

भाजपाच्या वतीने वेंगुर्लेत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परिक्षेत प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

वेंगुर्ले : शहरातील जि.प.शाळा नं.१ (तालुका शाळा) च्या इयत्ता ७ वी चा विद्यार्थी कु.वेद अभिषेक वेंगुर्लेकर याने तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात ४ क्रमांक तसेच इयत्ता ४ थी चा विद्यार्थी कु.पार्थ गजानन चिपकर याने तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला. तसेच वेंगुर्ले शाळा नंबर ४ ची विद्यार्थींनी हंसीका जगंन्नाथ वजराठकर हिने तालुक्यात दुसरा व जिल्ह्यात सातवा क्रमांक मिळवून ह्या तिनही विद्यार्थ्यांनी इस्त्रोच्या सहलीत सहभाग नोंदवला याबद्दल भाजपा च्या वतीने त्यांच्या प्रशालेत जाऊन शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

वेंगुर्ले शाळा नंबर १ मधील विठाई सभागृहात आयोजित कार्यक्रमात मा.नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते दोन्ही गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. यावेळेस मार्गदर्शन करताना राजन गिरप म्हणाले कि आपण आपल्या शाळेबरोबर आपल्या आईवडीलांचे तसेच तालुक्याचे नाव रोशन केले आहे. त्यामुळेच आपण कौतुकास पात्र आहात. आपल्या मधिल विद्यार्थी भविष्यात “सुनिता विल्यम” सारखी कामगिरी करेल, असा आशावाद व्यक्त केला.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई व अँड. सुषमा खानोलकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मा.उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, बुथ प्रमुख राजन केरकर, सौ.मयुरी राजन केरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान साटेलकर, उपाध्यक्ष राकेश सापळे, मुख्याध्यापक हरमलकर, शिक्षीका सौ.लिना नाईक, सौ.आव्हाड मॅडम, सौ.कुशे मॅडम , शिक्षक मिलिंद सरवदे तसेच पालक सौ.साक्षी वेंगुर्लेकर, सौ.चिपकर, सौ.बागडे, सौ.तारी उपस्थित होत्या.

वेंगुर्ले शाळा नंबर ४ मध्ये भाजपा महिला मोर्चा च्या सौ.वृंदा गवंडळकर यांच्या हस्ते हंसीका ज.वजराठकर हीचा सन्मान करण्यात आला. यावेळी आकांक्षा परब, मुख्याध्यापक श्रीम.संध्या बेहेरे, शिक्षक संतोष परब पदवीधर, श्री.सुधर्म गिरप, सुनंदा खंडागळे पदवीधर, सानिका कदम, नेहा परब उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा