You are currently viewing साटेली येथे २९ ते ३१ मार्च रोजी गुढीपाडवा महोत्सव

साटेली येथे २९ ते ३१ मार्च रोजी गुढीपाडवा महोत्सव

साटेली येथे २९ ते ३१ मार्च रोजी गुढीपाडवा महोत्सव

सावंतवाडी

कोकण सम्राट ग्रुप आणि साटेली ग्रामस्थ यांच्या माध्यमातून २९, ३० व ३१ मार्च रोजी मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर साटेली येथे गुढी पाडवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. साटेली येथील श्री देवी माऊली मंदिर येथे हा महोत्सव साजरा केला जाणार आहे.

या निमित्त २९ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ मोरे यांचा वैष्णवी महिमा हा पौराणिक नाट्य प्रयोग सादर केला जाणार आहे. तर ३० रोजी बुवा गुंडू सावंत व बुवा संदीप लोके यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सोमवार ३१ मार्च रोजी जिल्हास्तरीय निमंत्रितांची रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित राहुन सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा