*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पाण्यासाठी काहीही*
रखरखीत वाळवंट
तापले सूर्याच्या तेजाने
वणवण करिती मायलेकी
व्व्याकुळलेल्या तहानेने १
शोध पाण्याचा घेत फिरती
दूर दूर कुठेच दिसेना
पुढे पुढे चालत असती
दाह उन्हाचा सोसवेना २
नाही चिटपाखरू एकही
दृष्टीस न पडे कुणी वाटसरू
पाण्यासाठी तळमळे जीव
म्हणती आता काय करू ३
पाणी वाचवा, पाणी जिरवा
नारा गुंजतसे जगात
जल हेच खरे जीवन
मोठ्या नद्या भारतात ४
नसावी पाण्याची टंचाई
समृद्ध सुजलाम देशात
जाणून पाण्याचे महत्व
जीव सृष्टीच्या जीवनात ५
प्रतिभा पिटके
अमरावती