You are currently viewing अमृतघट….

अमृतघट….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अमृतघट…..*

 

रंभा म्हणा हो कुणी उर्वशी अमाप देते मला खुशी

मनात माझ्या प्रकटते नि वाढत जाते वेल जशी…

अमृत घट ते ओघळती हो अधरातूनी ती स्रवते अशी

स्वप्नरंजनी रंगून जाते अलगद पडते तिला फशी…

निजानंदी मी सदा विहरते गुजगोष्टी मजशी करते

तावावरती जरी उतरली हृदयांतरी पण तरी उरते…

रूपगर्विता छनछनछननन् मोहवते दुनिया सारी

हाती न लागते सहजासहजी नखरे तिचे हो लई भारी…

कधी ती येईल मुळी न कळते घेते लेखणी हातात

नऊ रसांची जणू पर्वणी करून जाते नादात…

सुखदु:ख्खाची खरी सोबती रीते कराया मन,असे

जनसामान्यास भावते आसू त्यांचे सुद्धा पुसे…अशी देणगी सुमनांची हो गळ्यातील ती ताईत

नाव जरी ना सांगितले मी तुम्हास आहे माहित…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा