वेंगुर्ले :
जागृती क्रिडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. संजय मालवणकर यांचा खेळामधील वारसा पुढे चालत ठेवून त्यांचीच पुतणी कु.दिया दिलीप मालवणकर हिने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत लांब उडी व ऊंच उडी या क्रीडा प्रकारात रौप्यपदक मिळवुन वेंगुर्लेचे नाव रोशन केल्याबद्दल भाजपा च्या वतिने मा.नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळेस अभिनंदन करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई म्हणाले कि , वेंगुर्लेत मैदानी खेळाची मुहूर्तमेढ जागृती कला क्रीडा मंडळाने रोवली व आता त्याच मंडळाची खेळाडू कु.दिया दिलीप मालवणकर हिने राज्यस्तरीय रौप्यपदक मिळवत ती परंपरा चालु ठेवली याबद्दल तिचे कौतुक भाजपा च्या वतीने करण्यात येत आहे .
या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर , मा.उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर , मा.नगरसेवक प्रशांत आपटे , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , मा.नगरसेवीका साक्षी पेडणेकर , अँड. प्रकाश बोवलेकर , शिवदत्त सावंत , बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ व निलेश गवस , बबन आरोलकर , संदेश नार्वेकर , सुरी कुडाळकर , उदय महाजन , छोटू कुबल , नवनाथ सातार्डेकर तसेच जागृती क्रीडा मंडळाचे दिलीप मालवणकर , विवेक राणे , प्रशांत मालवणकर , अमोल सावंत इत्यादी उपस्थित होते .