*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आनंदी उन्हाळा* ( बाल कविता )
———————————————————
तिखट मीठ
कैरीची फोड
करवंद जांभळं
आंबट गोड
रसदार तुरट
जामची फळे
गोड मऊसूत
ताडाचे गोळे
मधुर रसाळ
फणस गरे
जरा थोडेच
खाल्लेले बरे
लाल भडक
कापले कलिंगड
घरावर टांगली
बोन्डाची लड
अंगण परसात
कोकमं पिकली
काजू फळांनी
झाडं वाकली
उन्हाळा सारा
सजून गेला
खूप आनंदाने
भिजून गेला
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे