*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अभिजात मराठी*
ज्या मातीतून विरशौर्याचा गुलाल उधळला
त्याच मातीतून शिवबा जन्मला
मराठी तितुका मेळवावाचा संदेश
रामदास स्वामी सांगुन गेलेत
तिथेच मराठीचे ध्वज फडकलेत
एकनाथ,नामदेव,तुकारामांनी
किर्तन अभंग भारुड ओव्यातुन
माराठीची गौरव गाथा लिहली
ज्ञानेश्वर माऊलींच्या लेखणीतून
पसायदान प्रार्थना झाली
पुलं,अत्रे,गडकरी,माडगुळकरानी
माझी मराठी भाषा जगवली
विंदा,मर्ढेकर,बापट,शिरवाडकरानी
माराठी भाषा समृद्ध केली
माराठी भाषेसाठीच तर
जनाबाई मुक्ताबाई सावित्रीबाईं
क्रांती घडवून आणली
नेमाडे,फडके,कानिटकर,तेंडुलकर
पाडगांवकरांनी
माझी मराठी भाषा उदंड केली
बहिणाबाईंनी मातीत मराठी भाषेची
पेरणी केली
महानोरांनी शेतात मराठी भाषेची
लावणी केली
बालकवींनी निसर्गातून मराठी भाषा फुलवली
साने गुरुजी,शांताबाईं,खांडेकरांमुळेच
माझी मराठी अमृताहून गोड झाली
सुरेख सुंदर कंठातून लता दिदीने
मराठी भाषा सुरात गायली
या मातीत किती थोर संत महंत जन्मलेत
लीळाचरित्र,ज्ञानेश्वरी,विवेसिंधू
असे कितीतरी ग्रंथ लिहिले
तप त्याग तपश्चर्येतून
ज्यांनी माराठी भाषेचा गौरव केला
ते केशवसुत मराठी भाषेचे
जनक झालेत
मराठी भाषा अभिजात व्हावी यासाठी
किती काळ चालला संघर्षाचा लढा
किती किती विभूतींनी सोसल्यात
मराठी भाषेसाठी कळा
प्रत्येकाला होता मराठी भाषेचा लळा
सनई चौघडा तुतारी वाजवून
साजरा केला ३ऑक्टोबर २०२४
मराठी भाषेचा अभिजात उत्सव सोहळा
कोणीच माघार घेतली नाही
हार कोणीच पत्करली नाही
तळपत राहील भाषेसाठी लेखणी
अनेकांच्या योगदानातून
अभिजात भाषाची होत राहीली मागणी
नाटक सिनेमामुळे मराठी भाषेला
भरभराटी आली
मराठी नटांमुळेच मराठी माणसांनी
मराठी भाषा सम्राट केली
हार नाही माघार नाही
पावले पुढे पडतं राहीलेत
प्रयत्नांच्या पराकाष्ठेने
रंगनाथ पठारे सफल झालेत
मराठी भाषाले अभिजात दर्जा दिला
आई सरस्वती थोर तुने उपकार केलेत
किती दावे प्रतिदावे केलेत
किती किती पाठपुरावा दिलेत
झालेत कितीदा वादसंवाद
तेव्हाच झाली मराठी भाषा अभिजात
मानावेत किती ते कमीच आभार
भारत,महाराष्ट्र सरकार
करतो तुम्हांस आम्ही कोटी कोटी
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई*)
९४२२८९२६१८
९५७९११३५४७