You are currently viewing संत जनाबाई

संत जनाबाई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”संत जनाबाई”*

 

जनाबाईला विठू प्रेमाचा अखंड ध्यास

विठ्ठल भक्तांचे करील कल्याण दृढ विश्वासIIधृII

 

जन्मली गोदाकाठी गंगाखेड गावांत

करुंड-माता लाभली पिता दामा विठूभक्त

पंढरीत नामदेवा घरी आली झाली दासII1II

 

मानापमान पचवी बालपणापासून

आत्मकल्याण लोक कल्याण साधी तोंड देत

सामान्य स्त्री दाखवी साहण्याचे साहसII2II

 

प्रपंच वाटेवरील परमार्थ फुलं वेचित

कसे जगावे जनाई दर्शवी वास्तुपाठ

प्रपंच सुखासाठी ना घेई ध्यास सायासII3II

 

सुमधुर सरळ रसाळ अभंग रचित

पांडुरंगाला आळवी स्वरचित ओव्यांतून

जनाबाईला मानवता प्रभू प्रेमाची आसII4II

 

रचिले साडेतीनशे अभंग करी कीर्तन

कृष्णजन्म बालक्रीडा काला हरिश्चंद्राख्यान

नामदेवा दासी पोहोचली संतपदासII5II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा