You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आंदोलनाची आमदार केसरकरांकडून तात्काळ दखल

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आंदोलनाची आमदार केसरकरांकडून तात्काळ दखल

२७ मार्चला आरोग्य मंत्र्यांसोबत विशेष बैठक लावून योग्य ती भूमिका मांडणार; लेखी आश्वासन अंती आंदोलन स्थगित

सावंतवाडी :

येथील उपजिल्हा रुग्णालयात आज सकाळी नऊ वाजल्यापासून युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आरोग्याच्या विविध प्रश्नांवर जन आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत माजी मंत्री व सावंतवाडी विधानसभेचे आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील विविध समस्यांचा तात्काळ खुलासा करणेबाबत देण्यात आलेल्या निवेदनाची आणि छेडण्यात आलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत लेखी आश्वासन देण्यात आले.

तसेच या आंदोलनकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन माजी मंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी दिनांक २७ मार्च रोजी आरोग्य मंत्री यांच्यासोबत या विषयावर मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचे कळविले आहे. तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक बाह्य संपर्क डॉ‌. सुबोध इंगळे आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीशकुमार चौगुले यांनी आंदोलनकर्त्यांना तसे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर हे दिनांक २७ मार्च रोजी मंत्रालयातील सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सावंतवाडी मतदारसंघातील आरोग्य विभागातील विविध विषयांबाबत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्यासोबत संबंधित प्रश्न सोडविणे, तसेच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत योग्य ती भूमिका मांडणार आहेत. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव तसेच आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबईचे आयुक्त, आरोग्य सेवा मुंबईचे संचालक, सहसंचालक, अतिरिक्त संचालक, उपसंचालक तसेच उपसचिव आरोग्य विभाग मंत्रालय हे देखील उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान आमदार दीपक केसरकर यांनी घेतलेल्या या तात्काळ भूमिकेबाबत व वैद्यकीय अधीक्षक यांच्या अखत्यारीत येणा-या सर्व समस्या ७ दिवसात सोडवुन आंदोलन कर्त्यांची कोअर कमिटीची मिटींग लावू असे लेखी पत्र दिल्याने आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत तूर्तास हे आंदोलन आम्ही स्थगित करत असल्याचे सांगितले. मात्र यापुढे योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन अजून तीव्र करणार असल्याचाही इशारा दिला आहे.

यावेळी युवा रक्तदाता संघटना, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा केलेला निषेध लक्षात घेऊन प्रशासनाकडून हे लेखी आश्वासन मिळाले असल्याची भावना देव्या सूर्याजी व रवी जाधव यांनी व्यक्त करत तूर्तास हे आंदोलन स्थगित करत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांचेही विशेष आभार मानले आहेत.

*या आंदोलांकर्त्यांनी घेतला सहभाग*

या आंदोलनात सावंतवाडी शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष गोवेकर, ॲड. नकुल पार्सेकर, ॲड. संदीप निंबाळकर, पॉली परेरा, नंदकिशोर कोंडये, अनिकेत पाटणकर, दिग्विजय मुरगोड, देवेश पडते, राघवेंद्र चितारी, अभिजीत गवस, मेहर पडते, सुरज मठकर, रोहित परब, ज्ञानेश्वर जाधव, लक्ष्मण कदम, अमोल टेंबकर, भुवन नाईक, तौसिफ आगा, अमोल चव्हाण, रवी जाधव, प्राध्यापक सतीश बागवे, फ्रान्सिस रॉड्रिक्स, दत्तप्रसाद परब, सुशांत बुगडे, श्रीरंग म्हापसेकर, ओंकार गावडे, भाग्येश गावडे, श्रद्धा भाटवडेकर, संदीप निवळे, वसंत अमुणेकर, रूपाली गौंडर, शरदिनी बागवे, दादा मडकईकर, रवींद्र सावंत, विलास परब, रवींद्र काजरेकर, विनोद काजरेकर, प्रशांत बुगडे, प्रशांत परब, अशोक सावंत, आनंद परब, रोहन मल्हार, सिद्धेश साळसकर, राकेश हरमलकर, गौरव मेस्त्री, संजय हळदणकर, दिनेश परब, सुशील परब, वामन रेडकर, एकनाथ लोके, शिवप्रसाद परब, ओंकार नाईक, रोहन परब, रुची परब, शब्बीर मणियार, शैलेश नाईक, समीरा खलील, विकास गोवेकर, दशरथ कविटकर, शंकर गावडे, शहवाज काजरेकर, केशव जाधव, डॉ. जयेन्द्र परुळेकर, प्रथमेश प्रभू, शिवा गावडे, सुधीर पराडकर, तुकाराम कासार, विलास जाधव, सिताराम परब, विनीत परब, महेश काळे, मिताली शेडगे, मोहन जाधव, रुपेश पाटील, साबाजी परब, अजित सांगेलकर, आशिष सुभेदार, संदीप गवस, हेलन निब्रे, महेश कांडरकर, अनिकेत काजरेकर, जावेद शहा, विजय देसाई, हरिश्चंद्र पवार, शैलेश मयेकर, आनंद धोंड यांसह असंख्य सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान या सर्व सहभागी आंदोलनकर्त्यांचे युवा रक्तदाता संघटना तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संघटना यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा