*तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेचा विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ साजरा*
मुंबई :
सन १९१९रोजी स्थापना झालेली ही संस्था कित्येकांच्या योगदानातू उभी राहिली आहे. त्यामागे त्यावेळच्या लोकांमध्ये किती दूरदृष्टीपणा होता यांची कल्पना येते असे सामाजिक कार्यकर्ते रमेश कोळंबकर यांनी काल संध्याकाळी पराग हायस्कूल भांडुप पश्चिम येथे आयोजित तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेच्या १०२ व्या वार्षिक सभेत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना प्रतिपादन केले. प्रारंभी दिपप्रज्वलन व संस्थापक कै. कृष्णाजी धोंडू पवार सारंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण रमेश कोळंबकर, विलास कुबल, प्रमोद कांदळगावकर, पां.वा. पराडकर आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रमेश कोळंबकर यांनी सूचित केले की, आज युग हे तंत्रज्ञानाचे आणि स्पर्धा परीक्षा यांचे असल्याने कित्येक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतल्यास यश मिळविता येईल त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची आवश्यकता असून त्यासाठी मनाशी तयारी असेल तर यश निश्चित मिळणे सोईचे जाईल असे नमूद केले. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विलास कुबल यांनी सांगितले की, लवकरच आपणास नवीन इमारत बांधणीत कार्यालय उपलब्ध होणार असून कार्यालयाचे उद्घाटन आणि शताब्दी महोत्सव असा दुहेरी कार्यक्रम घेण्याचा मनोदय आहे. दरम्यान आपल्यापरीने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने संस्थेचे कार्य सुरू आहे. संस्थेचे जेष्ठ सल्लागार पांडुरंग तथा पां. वा. पराडकर यांनी संस्थेची कार्यकारणी यातून काम करत असल्याचे दिसून येते आहे. म्हणूनच संस्थाचा शताब्दी महोत्सव दिमाखदार सोहळा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.यानिमित्ताने सर्वंजण एकत्रित येतील त्यातून संवाद साधला जाईल असे नमूद केले. माजी अध्यक्ष प्रमोद कांदळगावकर, ग्रामसेवा संस्थेचे अध्यक्ष तुकाराम तथा नाना मोंडकर, डॉ. सुरेश सनये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर विचार मांडले. प्रारंभी मागील वर्षाचे इतिवृत्त, जमाखर्च ,अहवाल वाचन उपचिटणीस सुबोध येरम यांनी केले. यावेळी झालेल्या चर्चेत प्रदिपकुमार सारंग यांनी भाग घेतला. त्याला जेष्ठ सल्लागार पां. वा. पराडकर यांनी उत्तरे दिली. मोठ्या संख्येने सभासद उपस्थित राहावे म्हणून उपस्थित भाग्यवान दहा सभासदांची निवड करण्याची प्रथा आहे. त्यानुसार मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सदर समारंभ यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष चंद्रकांत कोळंबकर, चिटणीस हरिश्चंद्र कोचरेकर, खजिनदार दत्तात्रय धावडे, हिशेब तपासणी राजाराम बांदकर , सभासद सचिन जोशी, अजित सनये आदींनी परिश्रम घेतले. या समारंभाचे सूत्रसंचालन सुबोध येरम यांनी मार्मिक शब्दांत केले. यावेळी उपस्थितांना अल्पोपहार देऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.