सावंतवाडी :
सावंतवाडीतील सातार्डा आरोस पंचक्रोशीत विद्या विकास हायस्कूल मधील संगणक क्षेत्रातील पाठीमागील खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी संगणकाच्या दहा बॅटऱ्या लंपास केल्या. ही घटना आज सकाळी उघडकीस आली चोरटा स्थानिक असल्याचे सातार्डा पोलिसांनी वर्तवले आहे, असे संस्था उपाध्यक्ष बाळा परब यांनी सांगितले.
आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल चे नववी व दहावी वर्ग सुरू आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास घेत असताना इंटरनेट मध्ये कनेक्शन मिळत नाही म्हणून लिपिक तानाजी खोत व शिपाई शेळके यांनी संगणक कक्ष उघडला असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची कल्पना मुख्याध्यापक विद्याधर देसाई अध्यक्ष उपाध्यक्ष यांना दिली. त्यांनी पाहिले असता संगणकाच्या खिडकीचे दोन लोखंडी बार तुटले होते. या घटनेची माहिती सातार्डा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. चोर स्थानिक असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. अधिक तपास सातार्डा पोलीस करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच बाळा परब यांनी पाहणी केली व चोरट्यास तात्काळ अटक करण्याची मागणी सातार्डा पोलिसांकडे केली.