*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम लावणी*
लावणी : कवी
झब्बा पायजमा झोळी अशीच होती छवी
हायफाय झाला आता कवी ग बाई कवी
मोबाईल मधी रातरात उशिरा उठते स्वारी
चार ओळी लिहिता येता गगनी घेई भरारी
नोटपॅड हातामध्ये विसरला वहीपेन एरवी
हायफाय झाला आता कवी ग बाई कवी
सदा खातो भाव कविराज म्हणून मिरवी
कविवर्य कवीभूषण स्वयंघोषित ही पदवी
पुरस्कारा सदा भुकेला माजवितो यादवी
हायफाय झाला आता कवी ग बाई कवी l
करतो टीका दादागिरी फुकटची अरेरावी
हावभाव असे की मोठा नेता वाटतो भावी
लुकलुकतो काजवा बोलतो स्वतःला रवी
हायफाय झाला आता कवी ग बाई कवी l
विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664