You are currently viewing खारेपाटण जिजामाता नगर येथे रस्ते विकासकामांचा शुभारंभ

खारेपाटण जिजामाता नगर येथे रस्ते विकासकामांचा शुभारंभ

शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवली :

खारेपाटण विभागातील जिजामाता नगर अंतर्गत रस्ते विकासकामांचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा आज शिवसेना खारेपाटण व तळेरे विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण विकासकामांचे उद्घाटन शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

 

यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश सावंत पटेल, उपतालुका प्रमुख मंगेश गुरव, गुरू शिंदे (ग्रामपंचायत सदस्य), सुहास राऊत (शहर प्रमुख), मंगेश ब्रह्मदंडे (संचालक, जिल्हा कृषी समिती), तसेच सुरेश आप्पा गुरव, संतोष राऊत, कुबल गुरुजी, उन्हाळकर गुरुजी, किशोर माळवदे, तृप्ती पाटील, सुभाष गुरव, दत्ताराम गुरव, प्रशांत गाठे, सागर कांबळे, संदीप पाटील यांसह अनेक शिवसैनिक, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

या रस्ते विकासकामांसाठी आमदार किरण सामंत, आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी भरीव योगदान दिले असून, ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार मानले. भविष्यातही अशा पायाभूत विकास प्रकल्पांसाठी सहकार्य मिळावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा