सावंतवाडी :
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील अनेक गंभीर समस्यांबाबत उद्या सोमवारी दि.२४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता स्थळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे सर्वांनी जमून झोपलेल्या व निर्ढावलेल्या प्रशासनाला जाग आणायची आहे. जेणेकरुन सर्वसामान्य जनतेला रुग्णांना होणारा त्रास जिवीतहानी थांबली पाहिजे तसेच गोवा बांबोळी वारी रोखली पाहिजे.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयावर आज आजुबाजुची असंख्य गावे अवलंबून आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांचे हाल थांबण्यासाठी.
वैद्यकीय अधिक्षक यांचा पुर्णपणे रुग्णालयावर दुर्लक्ष झालेला असून याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे त्यामुळे तातडीने वैद्यकीय अधीक्षक बदलून कायमस्वरुपी चांगला वैद्यकीय अधीक्षक द्यावा. सर्वात महत्त्वाचे सर्व रिक्त पदे तातडीने मंजूर करून भरण्यात यावी. फिजिशियन, न्युरोलॉजिस्ट,हृदयरोग तज्ञ मिळावा, कायमस्वरुपी भूलतज्ज्ञ तसेच सफाईगार (कटर) हि सर्व पदे तातडीने भरावी या प्रामुख्याने मागण्या असतील.
जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील यासाठी आपण सर्व नागरिकांनी, मित्रमंडळीनी, संघटनेतील सर्व पदाधिकारी सदस्यांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊन सर्वसामान्य जनतेचा आवाज उठवून मोठ्या प्रमाणात होणारे रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी एकत्र जमूयात, असे आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी जाधव यांनी केले आहे.