You are currently viewing शब्दकवितांचे भाव

शब्दकवितांचे भाव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती वाघमारे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्दकवितांचे भाव*

 

शब्दात गुंफून शब्द

शब्दही होतात मोती.

शब्दसुमनांच्या स्तुतीने

जवळ येतात नाती .

 

शब्दास जोडून शब्द

शब्दही होतात वेद .

शब्दातून शब्दांची

कविता घेते छेद .

 

अक्षरात शब्दांची

किमया असते भारी .

शब्दात गुंफून शब्द

कविता करते नारी .

 

अक्षरांचे जोडून शब्द

कवितेची होते ओळ .

लिहिताना कविता

विचारास लागतो वेळ

 

शब्दास जुळवून शब्द

कविता होते सुंदर .

मायबाप प्रेक्षक

हेच कवीचे मंदिर.

 

जादूगार शब्दांचा

वेडा असतो कवी .

भक्ती गीत अभंगगाणे

होते सकाळ नवी.

 

गळ्यात ज्याच्या कोकिळा

त्याने मधुर गाणी गावी .

कवी मनाच्या माणसाने

सुंदर कविता लिहावी.

 

सौ भारती वसंत वाघमारे

राहणार मंचर

तालुका आंबेगाव

जिल्हा पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा