You are currently viewing ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

*’वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम* – *राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन*

पिंपरी

‘वकील आपल्या दारी’ हा देशातील पहिला आणि आगळावेगळा उपक्रम आहे!’ असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन, मुंबई येथे गुरुवार, दिनांक २० मार्च २०२५ रोजी काढले. गरीब आणि गरजू लोकांना तसेच कैद्यांना मोफत कायदेशीर सल्ला देण्यासाठी ‘दर्द से हमदर्द तक ट्रस्ट’ने
सुरू केलेल्या ‘लीगल एड ऑन व्हील्स’ (‘वकील आपल्या दारी’) या उपक्रमाचा राजभवन, मुंबई येथे माननीय राज्यपाल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त ॲड.
प्रकाश साळसिंगीकर, ॲड. सुनीता खंडाळे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे यांनी ट्रस्टच्या वतीने राज्यपाल राधाकृष्णन यांना स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित केले.

ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी ‘लीगल एड ऑन व्हील्स’ अर्थातच ‘वकील आपल्या दारी’ या प्रकल्पाची माहिती देताना दर्द से हमदर्द तक ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्रातील सर्व कारागृहामधील अतिरिक्त प्रमाणात असलेल्या कैद्यांच्या गंभीर समस्येवर काम करताना तुरुंगामध्ये येणाऱ्यांची देखील संख्या कमी व्हावी या साठी काम करते म्हणजेच गुन्हा घडूच नये यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचून जनजागृती करते व त्यांच्या समस्या या कोर्टापर्यंत जाण्यापासून थांबवते. तसेच अनेकांना त्यांच्या दारापर्यंत जाऊन कायदेशीर साहाय्य पुरवते. तुरुंगातील कित्येक वर्षे खितपत पडलेल्या कैद्यांना मोफत कायदेशीर साहाय्य पुरवते. यासाठीच विशेष वाहनाची तजवीज केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांनी ‘वकील आपल्या दारी’ यासाठीच्या विशेष वाहनाची पाहणी केली; तसेच त्यासोबत असलेल्या कायदेविषयक प्रदर्शनाविषयी जाणून घेत विनामूल्य कायदेशीर सल्ला देणाऱ्या वकिलांशी संवाद साधला. यावेळी या उपक्रमाला शुभेच्छा देताना राज्यपाल पुढे म्हणाले की, ‘अतिशय कौतुकास्पद असलेला हा उपक्रम प्रसारमाध्यमांतून महाराष्ट्रातील सर्व गावखेड्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. तसेच या प्रकल्पाची व्याप्ती वाढविली पाहिजे. भविष्यात दर्द से हमदर्द तक ट्रस्टच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला निश्चितच आवडेल!’

सामाजिक कार्यकर्ते रवींद्र संघवी, संस्थेच्या ॲड. सायली गोरडे, ॲड. गणेश नागरगोजे, ॲड. नितीन हजारे व अन्य स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी ॲड. विघ्नेश्वर सुब्रमण्यम यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे संस्थेचे कामकाज समजावून सांगितले तर ॲड. ओमकार पाटील, ॲड खेताराम सोलंकी यांनी उपस्थित सर्वांची ओळख करून दिली.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

_____________________________
*संवाद मीडिया*

👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓

*_डी जी बांदेकर ट्रस्ट मध्ये ऍडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा…._*

सावंतवाडीतील प्रसिद्ध डी.जी. बांदेकर ट्रस्ट घेऊन आले आहेत कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या भवितव्यासाठी आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस.. आणि *एक वर्ष फाउंडेशन कोर्स*

_होय… आता चित्रकला शिकण्यासाठी मुंबई पुण्यात जाण्याची गरज नाही…_

_आमच्या संस्थेत या आणि बदलत्या शिक्षणा प्रकारासोबत नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना शिका._

_मुंबई विद्यापीठाचे चार वर्ष डिग्री कोर्स साठी लागणाऱ्या सीईटी परीक्षेविषयी पूर्वकल्पना व सराव होण्याच्या दृष्टीने एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स_

_यु,आय, यु एक्स सॉफ्टवेअर, ग्राफिक डिझाईन, क्राफ्ट, कॅलिग्राफी, टायपोग्राफी, डुडलिंग,क्ले मॉडलिंग ॲनिमेशन इत्यादी गोष्टी विषय मूलभूत माहिती संधी…_

_👉विशेष म्हणजे फाउंडेशन कोर्स साठी कोणत्याही सीईटी परीक्षेची गरज नाही._

_शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी_
_प्रवेश प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू…_
तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी दर शनिवार आणि रविवार *आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस*

*(वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेची अट नाही)*

_चला तर मग कोर्ससाठी प्रवेश घ्या आणि छंदासोबत कलेची आवड जोपासा…_

*अधिक माहितीसाठी*👇

*तुकाराम मोरजकर*
*📲9405830288*

*सिद्धेश नेरुरकर*
*📲9420260903*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा