कासार्डे येथे दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार एक जखमी
कणकवली
मुंबई गोवा महामार्गावर कासार्डे ब्राम्हणवाडी बॉक्सवेल पूलावर मुंबई वरुन गोव्याच्या दिशेने मोटारसायकल घेऊन जाणा-या युवकचा ताबा सुटून दुचाकी पूलाच्या संरक्षक कठडयावर आदळल्याने अपघात होत या अपघातात मोटारसायकल चालक श्री सुर्यकुमार पांडे याचा जागीच मुत्यू झाला.तर मागे बसलेला त्याचा मित्राला किरकोळ दुखापत झाली.या अपघात दुचाकीवरील एक ठार व एक जखमी झाला असून सदर अपघात शनिवारी सकाळी 7:00 च्या सुमारास घडला.
अपघाताचे अधिक वृत्त असे की,शुक्रवारी रात्री नवी मुंबईवरुन गोवा येथे टीव्हीएस स्पोर्टस मोटारसायकल वरुन गोवा येथे पर्यटनासाठी येणारे श्री.सुर्यकुमार पांडे, वय २४,सध्या रा. नवी मुंबई तुर्भे वाशी (मूळ उत्तर प्रदेश) व श्री.अंनिस शर्मा, वय २१, सध्या रा.जुईनगर सेक्टर नवी मुंबई,(मूळ रा. बिहार ) हे दोन युवक सिंधुदुर्ग जिल्हातील मुंबई गोवा महामर्गावरुन गोव्याच्या दिशेने जाणा-या लेनवर कासार्डे ब्राम्हणवाडी बॉक्सवेल पूलावर आले असता मोटारसायकल चालक श्री.सुर्यकुमार पांडे याला डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याची मोटरसायकल पूलाच्या संरक्षक कठडयावर जाऊन आदळली.
अपघातानतंर चालक श्री पांडे याच्या डोके संरक्षक कठडयावर आदळल्याने त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत होत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यावर तो जागीच मुत्यूमुखी पडला तर मागे बसलेला श्री.अंनिस शर्मा याला किरकोळ दुखापत झाली.या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक व पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे,पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी मदतकार्य करत 108 रुग्णवाहीकेने दोघांना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.यावेळी जखमी शर्मा याच्यावर उपचार करण्यात आले तर मृत पांडे याच्या नातेवाईकाना संपर्क साधत त्याचा मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला. महिंद्रा कंपनीत कामाला असणारे हे दोन युवक गोवा येथे पर्यटनासाठी येत असताना त्याच्यावर काळाने घाला घेतल्याने दुचाकी वरून पर्यटनाला येणे त्याच्या जीवावर बेतला असून अपघाती निधनाने स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.