You are currently viewing दि.२४ मार्च रोजी वैभववाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

दि.२४ मार्च रोजी वैभववाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

*दि.२४ मार्च रोजी वैभववाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर*

वैभववाडी

आजच्या धावपळीच्या आणि फास्ट फुडच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती कोणत्या तरी शारीरिक समस्येने आणि तणावाने ग्रस्त आहे. त्याची योग्य वेळी माहिती होण्यासाठी आणि पुढील धोका टाळण्यासाठी सोमवार दिनांक २४ मार्च रोजी आरोग्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या माधवबाग कणकवली शाखेचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस, मानसिक ताणतणाव, सांधेदुखी, पित्ताचा त्रास, थायरॉईड लठ्ठपणा, ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी आणि बायपास केलेल्या किंवा सुचवलेल्या रुग्णांची मोफत तपासणी माधवबागची तज्ञ टिम करणार आहे.
ईसीजी, रँडम शुगर, डॉक्टर कन्सल्टेशन, बीपी,एसपीओ-२ व आहाराविषयी मोफत सल्ला मिळणार आहे. गरज असल्यास योग्य दरात औषधे उपलब्ध होणार आहेत.
सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिर पोलीस ठाणे वैभववाडी, ज्येष्ठ नागरिक संघ वैभववाडी आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १०.०० ते १.३० या वेळेत पोलीस ठाणे वैभववाडी येथे आयोजित केले आहे. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा वैभववाडी तालुक्यातील नागरिक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, जेष्ठ नागरिक व गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन वैभववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुनील अवसरमोल यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी श्री.सुनील अवसरमोल- (9850429007), श्री.शांताराम रावराणे- (9422821614), प्रा.श्री.एस.एन.पाटील- (9834984411) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा