You are currently viewing आंबोलीत कंटेनरची झाडाला धडक

आंबोलीत कंटेनरची झाडाला धडक

आंबोलीत कंटेनरची झाडाला धडक

आंबोली

आंबोली नांगरतास गदडुवाडी येथे रस्त्याच्या बाजूस असलेल्या झाडास आदळून कंटेनर ( HR. 61.E. 0479 ) चा अपघात झाला. रात्री १२ च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात जखमी चालक अनिलकुमार चंद्राभान (वय ४२ रा.गोलपूर, जि. बिवानी, हरियाणा ) याचा उजवा पाय गाडीच्या केबिमध्ये अडकून पडलेला होता. सदर अपघाताची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे अंमलदार दिपक शिंदे आणि मनीष शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन लोकांच्या मदतीने जखमीस गाडीतून सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा