You are currently viewing बांदा केंद्र शाळेतील १००विद्यार्थ्यांना झाशीचे राणी पुस्तकाचे वितरण

बांदा केंद्र शाळेतील १००विद्यार्थ्यांना झाशीचे राणी पुस्तकाचे वितरण

*बांदा केंद्र शाळेतील १००विद्यार्थ्यांना झाशीचे राणी पुस्तकाचे वितरण*

बांदा

सिंधुदुर्ग जिल्हा कऱ्हाडे ब्राह्मण संघ सावंतवाडी यांच्या वतीने बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं १केंद्र शाळेतील इयत्ता तिसरी व चौथी इयत्तेतील १००विद्यार्थ्यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई हे पुस्तक विद्यार्थ्यांना वितरित करण्यात
कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष प्रदिप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ब्राह्मण संघ सदस्य विनायक उमर्ये,शेखर लळीत शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संपदा सिध्दये, सदस्य हेमंत दाभोलकर, संतोष बांदेकर ,ज्येष्ठ शिक्षिका रसिका मालवणकर , जे.डी.पाटील ,जागृती धुरी,स्नेहा घाडी, शुभेच्छा सावंत कृपा कांबळे, मनिषा मोरे आदिच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या शाळेतील विद्यार्थीनी सोनम राजू लमाणी,युतिका प्रदिप बांदेकर व भूमी आनंद मळगावकर यांना ब्राह्मण संघाच्या वतीने रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शाळेला रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा शाळेला भेट देण्यात आली.यावेळी अध्यक्ष प्रदिप जोशी यांनी राणी लक्ष्मीबाई यांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमाची गाथा विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक उमर्ये यांनी केले सुत्रसंचालन उपशिक्षक जे.डी.पाटील तर आभार रसिका मालवणकर यांनी मानले यावेळी ब्राम्हण संघाच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ब्राह्मण संघ व शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक शांताराम असनकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांनी धन्यवाद मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा