You are currently viewing इंडस टावर्स राबविणार महाराष्ट्रातील १५ शासकीय शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम कार्यक्रम

इंडस टावर्स राबविणार महाराष्ट्रातील १५ शासकीय शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम कार्यक्रम

इंडस टावर्स राबविणार महाराष्ट्रातील १५ शासकीय शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम कार्यक्रम

शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने ९५० हून अधिक विद्यार्थ्यांना करणार डिजिटली साक्षर

सिंधुदुर्ग

टेलिकॉम पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडस टावर्स लिमिटेड यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि नंदुरबार जिल्ह्यातील १५ शासकीय शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली. हा उपक्रम शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने राबवला जात आहे. इंडस टावर्सच्या या स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

इंडस टावर्सचा प्रमुख क्रोपोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम असलेल्या “सक्षम” अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जात आहे. याअंतर्गत वर्गखोल्यांना स्मार्ट डिजिटल पायाभूत तंत्रज्ञानासह रूपांतरित करण्यात येणार आहे. तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांसाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

भारत सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला पूरक असलेला हा स्मार्ट क्लासरूम कार्यक्रम केवळ ९५० हून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरतेसाठी सक्षम करणार नाही, तर १४० हून अधिक शिक्षकांना त्यांच्या अध्यापन पद्धतीत डिजिटल साधनांचा समावेश करण्याचे प्रशिक्षणही दिले जाईल.

या उपक्रमाबद्दल बोलताना सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील म्हणाले, “इंडस टावर्सचा स्मार्ट क्लासरूम कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्याला डिजिटल सक्षम समाज आणि ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था बनवण्याच्या आमच्या उद्दिष्टाचा एक महत्त्वाचा भाग आहे. डिजिटली सक्षम आणि समावेशकता सुनिश्चित करत हा उपक्रम शाळांना महत्त्वपूर्ण डिजिटल पायाभूत सुविधा आणि आवश्यक प्रशिक्षण पुरवतो ज्यामुळे अधिक प्रगत आणि समावेशक शिक्षण प्रणाली निर्माण होते.”

इंडस टावर्स तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवण्यास कटिबद्ध आहे. आमच्या स्मार्ट क्लासरूम कार्यक्रमाद्वारे, आम्ही शिक्षण क्षेत्रात असलेली डिजिटल दरी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत, शिक्षणाचा अनुभव समृद्ध करत आहोत आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला आकार देत आहोत, असे इंडस टावर्सचे महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुकेश थरेजा म्हणाले.

एनआयआयटी फाउंडेशनच्या साहाय्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या शिक्षकांच्या नेतृत्वाखालील स्मार्ट क्लासरूममध्ये संगणक, एलईडी स्मार्ट टीव्ही, प्रिंटर आणि वीज गेल्यास विद्युत बॅकअप यांसारखी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा