जागतिक वन दिनानिमित्त वृक्षारोपणांचा कार्यक्रम संपन्न
सिंधुदुर्गनगरी
जागतिक वन दिनानिमित्त सामाजिक वनीकरण, विभाग यांच्या मार्फत स्मृती उद्यान ओरोस या ठिकाणी जिल्हाधिकारी अनिल पाटील व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत बी. गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाले, असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.
या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी राजेंद्र मगदूम, भूसंपादन उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, महिला व बाल विकास अधिकारी, सोमनाथ रसाळ, कोर्ट मॅनेजर, प्रशांत मालकर, सहा. वनसंरक्षक एल. व्ही. पोतदार, वनक्षेत्रपाल (प्रा.) संदिप कुंभार, मुख्य लेखापाल पी.एन. राठोड, वनपाल सुनिल सावंत, वनपाल दत्तगुरु पिळणकर, वनपाल व वनरक्षक शिवाजी लटके, सुरज बागुल, सामाजिक वनीकरणाचे कर्मचारी तसेच न्यू इंग्लिश स्कूल ओरोस शाळेतील हरित सेनेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी वृक्षलागवडीनंतर स्थानिक प्रजातीचे व फळ झाडांची वृक्ष लागवड करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जसे ‘वाचाल तर वाचाल’ सांगितले आहे. तसे यापुढे झाडे लावाल तर जगाल असे वृक्षांबाबतचे महत्व उपस्थितांना व न्यु इग्लिश स्कूल ओरोस शाळेतील हरित सेनेचे विद्यार्थीना मार्गदर्शन केले.
विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, यांच्याकडुन उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.