You are currently viewing जागतिक क्षयरोग दिनानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन

जागतिक क्षयरोग दिनानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन

जागतिक क्षयरोग दिनानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमातर्गत  24 मार्च हा “जागतिक क्षयरोग दिन”  म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी  यांनी दिली आहे.

जागतिक स्तरावर दरवर्षी 24 मार्च हा दिवस क्षयरोगविषयी जनजागृती करण्यासाठी “जागतिक क्षयरोग दिन” म्हणुन साजरा करण्यात येतो. राज्यात  100 दिवस मोहिमेच्या निमित्ताने विविध प्रभावी प्रचार व प्रचार माध्यमांच्या वापर करून क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात आलेली आहे. जनजागृतीची व्याप्ती अधिक वाढविण्यासाठी ह्या दिवशी  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 मार्च 2025 साठी “Yes!We can End TB:Commit,Invest,Deliver” हे इंग्रजीतून तर “होय आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो: प्रतिज्ञा करा, तरतुद करा, सेवा द्या” हे मराठीतून घोषवाक्य तयार केलेले आहे.  या घोषवाक्यानुसार क्षयरोग संपविण्यासाठी  सर्वांनी 3 प्रकारची कार्यवाही करण्यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. १) प्रतिज्ञा करा -सर्व भागीदारांनी क्षयरोग संपविण्यासाठी प्रतिज्ञा घेणे. २) तरतुद करा – नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणे क्षयरोगविषयक सेवा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी असलेल्या त्रुटी दुर करणे आणि प्रगतशील संशोधन करणे यासाठी निधीची तरतुद करणे. ३) सेवा द्या- क्षयरुग्णांच्या फायद्यासाठी प्रतिज्ञेनुसार व केलेल्या तरतूदीनुसार त्यांना दर्जेदार सेवा देणे.

या दिनानिमित्त क्षयरोगाविषयी समाजात जनजागृती करण्याकरीता विविध सांस्कृतीक कार्यक्रम, बैठका, चर्चासत्रे, परिसंवाद,व्याखाने क्षयरोगाविषयक विविध प्रसिध्दी साहित्याचे प्रदर्शन, रोड शो, रॅली, चित्ररथ, निबंध स्पर्धा पथनाट्य, क्षयरोग मुक्त ग्राम पंचायत गौरव समारंभ इ. प्रकारे समाजातील सर्व स्तरावर विविध माध्यमाव्दारे कार्यक्रमाचे आयोजन करुन 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणु साजरा करण्यात येणार आहे.

100 Days TB Campaign  विशेष उपक्रम

जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेल्या 100 दिवसीय मोहिम (100 Day TB Campaign) यामोहिमेत जोखीमग्रस्त भागातून निवडलेल्या 168397 जोखीमग्रस्त लोकसंख्येबरोबरच जिल्ह्यातील 2 अनाथाश्रम, 3 वृध्दाश्रम, 2 उद्योग संस्था, 2 निवासी शाळा, 2 कारागृहे या संस्थामध्ये विशेष क्षयरोग तपासणी शिबीर आयोजन तसेच प्रत्यक्ष बांधकाम व कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून स्थलांतरित, ऊसतोडणी कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करुन या गटातील एकूण 168397 पैकी 168137 एवढ्या लाभार्थ्यांची क्षयरोग विषयक तपासणी (TB Screening) करण्यात आलेली आहे. त्यापैकी संशयित रुग्णांची एक्स रे तपासणी 17200 Naat Testing – 5237 तसेच 3719 एवढ्या लाभार्थ्याची Sputam microscopy करण्यात आलेली आहे. त्यातून 242 रुग्ण क्षयरोग बाधित आढळून आलेले आहेत. जिल्हास्तर व तालुकास्तरावर नियोजन करुन संशयित व्यक्तीची थुंकी तपासणीबरोबर क्ष- किरण तपासणीही करण्यात आलेली आहे. या अभियान कालावधीत एकुण 249 उपकेंद्राच्या माध्यमातुन 744 गावामधुन समाजातील सर्व स्तरावर दृक श्राव्य माध्यमाव्दारे, निक्षय वाहन, निक्षय शिबिरे, ग्रामसभा, तपासणी शिबिर आयोजन, पोस्टर हॅन्डबील वाटप, वॉल पेन्टींग, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेऱ्या, शाळा कॉलेज भेटी,  शपथव्दारे क्षयरोग जनजागृती व इतर आजाराविषयी माहिती देण्यात येत आहे.

टीबी मुक्त ग्रामपंचायत 2024

सन 2023 साठी जिल्ह्यातील एकूण 431 ग्रामपंचायती पैकी 70 ग्रामपंचायतींना कास्य पदक देऊन गौरविण्यात आलेले होते. टिबी मुक्त ग्रामपंचायत 2024 घोषित करीता ग्रामपंचायत स्तरावरुन प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत. सन 2024 करीता 38 ग्रामपंचायतीची रौप्य पुरस्काराकरीता तसेच 75 ग्रामपंचायतींची कास्य पुरस्काराकरीता निवड करण्यात आलेली आहे.

निक्षय मित्र आवाहन

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत “प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियान” या धोरणानुसार क्षयरुग्णांना अभियानांतर्गत सामाजातील दानशुर व्यक्ती, संस्था, कंपनी, लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत क्षयरुग्ण निक्षय मित्र म्हणुन दत्तक घेवून त्यांना उपचार कालावधीपर्यंत प्रतिमहिना फुड बास्केट देण्यात येते.

आपल्या माध्यमाव्दारे समाजातील दानशुर, प्रतिष्ठित व्यक्तींना निक्षय मित्र होवून समाजातील गरजु व गरीब क्षयरुग्णांना पोषण आहार किट देवून शासनाच्या या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव, तसेच क्षयरोग मुक्तीसाठी सर्वाचा सहभाग महत्वाचा असून जनभागीदारी व्दारे ही मोहिम आपण यशस्वी करु शकतो तरी  सर्वांनी या मोहिमेत सहभागी होवून ही मोहीम यशस्वी करुया असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा