*खाजगी लक्झरी बस द्वारे विनापरवाना मालवाहतूक विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुकिंग एजंट यांनी पुकारलेल्या आंदोलनास मनसे वाहतूक सेनेचा पाठिंबा.*
*मनसेच्या मागणीनंतर नंतर जाग येऊन स्थानिक बुकिंग एजंट पाठोपाठ मालवाहक संघटना सुद्धा खाजगी बस मालकांच्या मनमानी कारभाराविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत.*
*परिवहन विभाग सिंधुदुर्ग मार्फत नियमानुसार योग्य कारवाई न झाल्यास मनसे रस्त्यावर उतरून नियमबाह्य वाहतूक रोखणार उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.*
खाजगी बस द्वारे होणाऱ्या विनापरवाना मालवाहतुकीवर कारवाई करून अवाच सव्वा वाढलेले तिकीट दर नियंत्रित करावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा परिवहन विभागास दिलेल्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुकिंग एजंट यांनी गुरुवारी सकाळी आरटीओ चेक पोस्ट बांदा येथे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. सदर आंदोलनात मनसे वाहतूक सेनेचे विजय जांभळे यांनी उपस्थित रहात पाठिंबा दिला. मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई खाजगी बस मधून मोठ्या प्रमाणात विनापरवाना मालाची वाहतूक होत आहे. सदरचे मालाची वाहतूक गाडीच्या सीट वरून स्लीपर कोच वरून सुद्धा होते.यामुळे याचा परिणाम गाड्यांच्या तिकीट दरावर होतो व गाड्यांच्या तिकिटाचे दर येते जाते दोन हजार ,तीन हजार आणि चार हजार वर पोहोचतात आणि याचा भू दंड सामान्य प्रवाशांना भोगावा लागतो. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बुकिंग एजंटला सीटवर सुद्धा मालवाहतूक केल्यामुळे बुकिंग साठी सीट सुद्धा उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे शासनास दरवर्षी विविध टॅक्स भरून चालणाऱ्या मालवाहू गाड्यांना भाडे मिळणे मुश्किल झाले आहे. याच कारणास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने परिवहनचे सिंधुदुर्ग जिल्हा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.काळे यांना निवेदन देत सदर बाब लक्षात आणून दिली होती.
खाजगी बस मालकांच्या मनमानीवर आरटीओ मार्फत योग्य कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास मदत म्हणून रस्त्यावर उतरून विनापरवाना मालवाहतूक रोखले असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी सांगितले आहे.
.______________________________
*संवाद मिडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)
*MHT- CET 2025* *क्रॅश कोर्स*
12 वी science च्या विद्यार्थ्यांसाठी.
Sub..*PCM / PCB*
बॅच सुरू..*1 मार्च 2025 पासून.*
https://sanwadmedia.com/160963/
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून.*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, Maths English*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून*
Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *15 एप्रिल 2025 पासून*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
(16 वर्ष यशस्वीतेची )
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*