You are currently viewing चवदार तळे शांत झाले तरीही…

चवदार तळे शांत झाले तरीही…

*डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे सदस्य लेखक कवी शाहीर मनोहर पवार केळवदकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चवदार तळे शांत झाले तरीही…….*

 

चवदार तळ्याच्या

पाणवठ्यायातून बाबा साहेब तुम्ही घेतलत

मुठभर ओंजळीत पाणी! अन् लिहीली गेली संघर्ष कहाणी !

 

दिलेस अखिल मानवतेला मुक्त करून! जुल्मी जोखडातून हजारो वर्षाच्या गुलामीतून

 

जनावराचे जगणे लाथाडून पाणवठा केला खुला पिण्याच्या

पाण्यासाठी !

उभा ठाकला महामानव लाचार माणसासाठी

 

बाबासाहेब तुम्ही मुक्ती दाता!

लाखो जनांचे

 

चवदार तळे आता झालाय शांत!

पण पेटवलीत माणसे

विद्रोहासाठी! आपल्या हक्कासाठी!

अंगार पेटता ठेवलाय आम्ही काळजात !

चवदार तळे शांत झाले तरीही .

……………….

मनोहर पवार .

प्रतिक्रिया व्यक्त करा