You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील जांभवडे येथील होळी उत्सवावरील बंदी उठवली

वैभववाडी तालुक्यातील जांभवडे येथील होळी उत्सवावरील बंदी उठवली

वैभववाडी तालुक्यातील जांभवडे येथील होळी उत्सवावरील बंदी उठवली

कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचा आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी केला रद्द*

कणकवली

वैभववाडी तालुक्यातील जांभवडे येथील श्री देव गांगो व श्री देवी लक्ष्मी मंदिरात होळी उत्सव साजरा करण्यास कार्यकारी दंडाधिकारी वैभववाडी यांनी घातलेला बंदी आदेश उपविभागीय दंडाधिकारी श्री. जगदीश कातकर यांनी अपिलात रद्द केला आहे.अपिलकार आकाराम गुरव वगैरे ३ यांच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी दाखल केलेला रिव्हिजन अर्ज मान्य करत अर्जदार,सामनेवाले व संपूर्ण गाव यांचे मानपान अबाधित ठेवून शांततेत होळी उत्सव साजरा करण्यात यावा असे आदेश पारित केले आहेत.*

वैभववाडी तालुक्यातील जांभवडे येथील श्रीदेव गांगो व श्रीदेवी लक्ष्मी मंदिरात १४ ते २८ मार्च या कालावधीत होणारा होळी उत्सव साजरा करण्यास वैभववाडी कार्यकारी दंडाधिकारी बंदी आदेश पारित केला होता. या आदेशाविरुद्ध आकाराम गुरव वगैरे ३ यांनी ॲड उमेश सावंत यांच्यामार्फत उपविभागिय दंडाधिकारी यांच्याकडे हा रिव्हीजन अर्ज दाखल केला होता. यात सामनेवाले नवनाथ पालांडे वगैरे १५ त्यांच्यावतीने कार्यकारी दंडाधिकारी वैभववाडी यांच्याकडे दाखल अर्जावर रिव्हीजन अर्जदार गुरव पक्ष यांना बाजू मांडण्याची योग्य संधी न देता एकतर्फा आदेश पारित केल्याचे व खालील कोर्टाच्या आदेशात कोणतेही स्पष्टीकरण नाही म्हटले होते. त्यावर उपविभागिय दंडाधिकारी यांच्याकडे झालेल्या सुनावणीअंती रिव्हीजन अर्जाच्या सुनावणीच्या कामी उपस्थित सामनेवाला यांनी यापूर्वीचे २०२३चे सप्ताह उत्सवात मान डावलल्याच्या कारणाने आताही होळी आपला मान डावलला जाईल या भीतीपोटी कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता असे कोर्टात समक्ष सांगितले. अन्य सामनेवाले यांनी प्रथम पालखीचा मान आणि नारळाचे फोडीचा मान याव्यतिरिक्त मानाची अन्य कोणती बाब नसल्याचे नमूद केले. रिव्हीजन अर्जदार यांनी त्यांचे पोलिसांकडे जबाबत पालांडे समाज म्हणजेच सामनेवाले यांचे मान-पान पाळण्यास तयार असल्याचे कबूल केलेले दिसून येते. याबाबत या न्यायालयाचे सुनावणीत ही गोष्ट त्यांनी मान्य केली आहे. या न्यायालयातील सुनावणी दोन्ही गटात होळीवरून वाद नसून कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज हा २०२३ सप्ताह उत्सवातील मानपानावरून होळी उत्सवातही मानपानावरून वाद होऊ नये म्हणून दिलेचा दिसून येतो. रिव्हीजन अर्जदार होळी सणात पालांडे समाजाला त्यांचा दिलेला मानपान पाळण्यास तयार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूकडून मानपानाचे मुद्द्यावरून होळी उत्सवात कोणताही अडथळा दिसून येत नसल्याने संपूर्ण गावाने शांततेत होळी उत्सव साजरा करण्यास हरकत दिसून येत नाही, असा निष्कर्ष काढत उपविभागिय दंडाधिकारी जगदीश कातकर यांनी रिव्हिजन अर्ज मंजूर केला आहे. तसेच कार्यकारी दंडाधिकारी वैभववाडी यांनी १३ मार्च २०२५ रोजी दिलेला बंदी आदेश रद्द केला असून रिव्हिजन अर्जदाह सामनेवाले व संपूर्ण गाव यांनी सर्वांचे मानपान अबाधित ठेवून शांततेत होळी उत्सव साजरा करावा. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असे स्पष्ट केले आहे.*

प्रतिक्रिया व्यक्त करा