You are currently viewing नाणोस ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचा कार्यभार अमिता नाणोसकर यांकडे

नाणोस ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचा कार्यभार अमिता नाणोसकर यांकडे

सावंतवाडी :

नाणोस ग्रामपंचायतच्या सौ . प्राजक्ता उमेश शेट्ये यांच्यावर अविश्वास ठराव झाल्यानंतर रिक्त असलेल्या ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंच पदाचा कार्यभार उपसरपंच सौ. अमिता सुधाकर नाणोसकर यांच्याकडे देण्यात आला. या वेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव नाणोसकर, आरोग्य अधिकारी सौ ज्योत्स्ना नवार, सौ गवाणकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री ज्ञानेश कलगुटकर, ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर, विनायक शेट्ये, सौ संध्या शेट्ये, सौ रसिका जोशी, सौ सानिया शेट्ये, ग्रामस्थ , ज्ञानेश पालयेकर, ग्रामपंचायत कर्मचारी मिलिंद नाणोसकर, सौ शारदा परब, कु. वर्षा जोशी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा