महाराष्ट्रातील अध्यापकांना साधी सहल काढायची असली तर अंगावर काटा येतो अशी आजची परिस्थिती आहे. अगोदर सहली भरपूर प्रमाणात निघायच्या. पण सहलीमध्ये होणाऱ्या दुर्घटनामुळे सहलीवर बरेच निर्बंध आहे. त्यामुळे बऱ्याचशा शाळांनी सहली हा विषय बाजूला ठेवला. पण आज वर्तमानपत्रांमध्ये बातमी वाचली आणि खूपच छान वाटले. एक चांगला आय ए एस अधिकारी काय करू शकतो त्याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे. आमच्या अमरावती जिल्हा मेळघाट आणि चिखलदरा या दोन आदिवासी तालुक्याचे प्रतिनिधित्व करतो. तसा हा दुर्गम भाग. आमच्या अमरावती जिल्ह्यातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षा माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात भाग घेऊन प्राविण्य प्राप्त केलेले आहे अशा विद्यार्थ्यांची निवड घेऊन करून त्यांना दिल्लीवारी करण्याचं धाडस एका महिला आयएएस अधिकाऱ्याने केले आहे आणि त्या महिला आय ए एस अधिकाऱ्याचं नाव आहे संजिता महापात्र. अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत.
शिक्षण क्षेत्राचे जे तज्ञ आहेत त्यांचे सर्वांचे असे म्हणणे आहे की विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्याबरोबर बाहेरचे जग दाखवले पाहिजे. बाहेरच्या जगातून त्यांना बरेच काही शिकायला मिळते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जर गावात असलेले राजा हरिश्चंद्र हे नाटक पाहिले नसते तर कदाचित त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला नसता.
महापात्र मॅडम यांनी आमच्या अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन स्मार्ट विद्यार्थी निवडले. असे विद्यार्थी की जे शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षा माझी सुंदर शाळा उपक्रमात सहभागी होऊन त्यांनी उच्चांक प्राप्त केला होता. त्या सर्वांना 25 26 27 28 या चार दिवस दिल्ली वारी घडवून आणण्याचा चंग त्यांनी बांधला. बर हा निर्णय साधासुधा नाही. हे विद्यार्थी वातानुकूलित रेल्वेने प्रवास करणार. शिवाय विमानाने परत येणार. याला म्हणतात दृष्टी. ही सर्व मुले भवितव्यामध्ये चमकल्याशिवाय राहणार नाहीत. कारण की ज्या शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये गडचिरोली सारख्या भागात ज्या मुलांनी रेल्वेही पाहिली नाही ते आमचे अमरावतीचे जिल्ह्यातले मुलं रेल्वे पाहणार विमान पाहणार विमानात बसणार याशिवाय राष्ट्रपती भवन लाल किल्ला लोटस टेम्पल संसद भवन राजघाट कुतुब मिनार इंदिरा गांधी मेमोरियल इंडिया गेट अक्षरधाम मंदिर त्याचबरोबर दिल्लीतील काही शाळांना भेटी देणार आहेत. या भेटीतून त्यांना मिळणारी शिदोरी ही आयुष्यभर पुरणार आहे. किती महत्त्वाचा निर्णय आहे हा.
अनेक वेळा अनेक उपक्रम हे खर्चिक असतात .पण लोकं उपयोगी नसतात. पण ते राबवले जातात. पण महापात्र मॅडमने या सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना दिव्य दृष्टी प्राप्त करून दिलेली आहे. जो आमच्या धारणीचा मुलगा कधी विमानात बसला नाही त्यांनी विमानेही पाहिले नाही तो आता विमानात बसणार आहे आणि खऱ्या अर्थाने या उपक्रमात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी व अध्यापक हे झेप घेणार आहे हे अलिखित भवितव्य आहे.
खरं म्हणजे असे उपक्रम करायला धाडस लागतं. मी पाहिले अनेक अधिकारी परंपरागत वाटचालीवरून वाटचाल करीत असतात. काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असूनही त्यातून उद्भवणाऱ्या समस्यामुळे ते टाळतात पण महापात्र मॅडम याला अपवाद ठरल्या.
आम्ही दरवर्षी मुलांची सहल काढतो. ती सहल अमरावतीतल्या अमरावतीत असते. सर्व विद्यार्थ्यांना विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा पोलीस अधीक्षक महानगरपालिका आयुक्त अमरावतीचे आयएएस सेंटर या सर्वांची तोंड ओळख करून देतो. त्या त्या ठिकाणी उपस्थित असलेले आयएएस अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचे मान सन्मान करतात. हा एक वेगळा आनंद असतो. मुले जेव्हा जिल्हाधिकारी कक्षात बसून प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांची संवाद साधतात तो अनुभव वेगळा असतो. सकाळी नऊ वाजता सुरू झालेली आमची ही सल रात्री नऊ वाजता संपते.
याच धर्तीवर संजिता महापात्र या आयएएस अधिकाऱ्यांनी उचललेले हे पाऊल धाडसी आहे. खरं म्हणजे या धाडसी पावलाचे अनुकरण संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. पण ते कितपत होईल त्याबद्दल शंकाच आहे. महापात्र ह्या महिला आयएएस अधिकारी सामाजिक बांधिलकीच्या अधिकारी आहेत. समाजामध्ये मिसळण्याचा त्यांचा कल पाहता आम्ही त्यांना काही कार्यक्रमात सहभागी करून घेतले.
आम्ही मुलांना दुसऱ्या वर्गापासून जिल्हाधिकारी होण्याचे प्रशिक्षण देत देतो. त्यानिमित्त विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आम्ही आयएएस अधिकाऱ्यांना भेटावयास घेऊन जातो. महापात्र मॅडमला मी जेव्हा भेटलो आणि त्यांना या शाळांमध्ये येण्याची विनंती केली .तेव्हा त्यांनी ती तात्काळ मान्य केली आणि त्याप्रमाणे त्यांनी शाळेमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. त्यांची माझी भेट झाली तेव्हा त्यांनी एक अभिनव कल्पना माझ्यासमोर मांडली आणि ती प्रत्यक्षात अमलात आणली .ती म्हणजे अमरावती जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. त्यासाठी त्या स्वतः त्यांचे दुसरे आयएएस अधिकारी श्री अमर राऊत यांचे खांडविकास अधिकारी श्री अभिषेक कासोदे यांची व्याख्याने व मार्गदर्शन त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी घडवून आणले.
परवा माझी आय ए एस झालेली विद्यार्थिनी पल्लवी चिंचखेडे तिचे आय ए एस चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमरावतीला आली. तिच्या वडिलांचा फोन आला. तिला अमरावती मधील सध्या कार्यरत आयएएस अधिकाऱ्यांना भेटायचे होते. मी विभागीय आयुक्तांना फोन लावला. त्या बाहेरगावी होत्या. संगीता महापात्र यांना फक्त संदेश टाकला तर त्यांनी लगेच तिच्या सत्कार व सुसंवाद असा भव्य कार्यक्रम अमरावतीच्या भव्य अशा पटांगणात आज सुरू असलेल्या महिला मेळाव्यामध्ये घडवून आणला. योगायोगाने हा कार्यक्रम सुरूच होता. या कार्यक्रमात पल्लवीला निमंत्रित करून एका गरीब घरची झोपडपट्टीत राहणारी वडील रंगकाम करणारे व आई शिलाई काम करणारी अशा जोडप्याची मुलगी कशी कलेक्टर होऊ शकते याचे जिवंत उदाहरण त्यांनी उपस्थित लोकांसमोर ठेवले. विशेष म्हणजे हा निर्णय मॅडमनी ताबडतोब घेतला. जितने वाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग ढगसे करते है या शिव खेडा यांच्या ओळींचे मला तिथे जाणीव झाली.
आज आमच्या अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 28 गुणवंत मुले दिल्ली वारीवर निघत आहेत. ही दिल्लीवारी त्यांना नक्कीच प्रगतीकडे दिव्यदृष्टीकडे घेऊन जाईल या शंकाच नाही. गल्लीतील मुले जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा अनेक गोष्टी शिकून येतात आणि ही शिकून येण्याची संधी त्यांना अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगीता महापात्र यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. असेच उपक्रम आमच्या महाराष्ट्रातील इतरही आयएएस अधिकाऱ्यांनी राबवावे अशी माफक अपेक्षा आहे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएस
अमरावती 9890967003