You are currently viewing श्री स्वामी समर्थ काव्य- वंदना, काव्यपुष्प -१३ वे

श्री स्वामी समर्थ काव्य- वंदना, काव्यपुष्प -१३ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

___________________________

श्री स्वामी समर्थ काव्य- वंदना, काव्यपुष्प -१३ वे

___________________________

श्री स्वामी समर्थांना करू वंदन । त्यांचे करू स्मरण ।

करू उपदेश-बोलांचे चिंतन । पालटेल मन आपुले ।। १ ।।

 

ताबा कधी आमचा नसतो ।शब्द जे आम्ही बोलतो ।

आमच्यावरच तो उलटतो । होते फजिती आमचीच ।।२ ।।

 

चंचल आमच्या मनाला । समर्था तुम्हीच लगाम घाला ।

आलो घेउनी या मनाला । चरणी माथा टेकवायला ।। ३ ।।

 

अक्कलकोटी येण्या आधी ती । स्वामींनी केली भ्रमंती ।

भारतभर ते फिरती । काश्मीर ते कन्याकुमारी ।। ४ । ।

 

केला त्यांनी प्रवास चौफेर । विविध ठिकाणी संचार ।

लौकिक त्यांचा झाला फार । सिद्ध-पुरुष म्हणती त्यांना ।।५।।

 

ग्रस्त- त्रस्त जनांना आधार दिला । संकटात भक्त रक्षिला।

कल्याण-मार्ग दाखविला । स्वामी समर्थांनी ।। ६ । ।

 

दुष्ट-प्रवृत्तीना सरळ केले । योग्य ते धडे शिकविले । जनांचे

अज्ञान दूर केले । भक्तवत्सल स्वामींनी ।। ७ ।।

**************

क्रमशः करी हे लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास – अरुण वि.देशपांडे- पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा