You are currently viewing संकेत प्रेमाचा

संकेत प्रेमाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा जनसंपर्क अधिकारी ज्येष्ठ लेखक कवी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संकेत प्रेमाचा*

 

नेहमी ऐकतोस लेका

घर केलेस मधूशाला

जेंव्हा लाडात बोलेल

घ्या पण जरा सांभाळा

समजून जा गड्या तो

संकेत आहे प्रेमाचा ।

 

स्वतःसाठी साड्या दोन

तिचा जीव कि प्राण

जेंव्हा ती घेईल स्वतःहून

तुझ्यासाठी रुमाल छान

समजून जा गड्या तो

संकेत आहे प्रेमाचा।

 

भांड्याची आदळआपट

रोज तुझ्यात काढते खोट

विसरून रोजची कटकट

होईल थोडी ती नटखट

समजून जा गड्या तो

संकेत आहे प्रेमाचा।

 

फुलदाणीत गुलाब सजला

गजरा केसात माळला

जेंव्हा ती विचारेल तुला

सुगंध कसा हो वाटला?

समजून जा गड्या तो

संकेत आहे प्रेमाचा।

 

रोजचाच ड्रेस पंजाबी

त्यावर ओढणी गुलाबी

जेंव्हा नेसून साडी बोलेल

खुलते का साडीत कळी?

समजून जा गड्या तो

संकेत आहे प्रेमाचा।

 

थोडा रुसवा थोडा फुगवा

बसेल कोपऱ्यात जाऊन

जेंव्हा ती वदेल लटकेच

तुझ्या शिवाय माझे कोण ?

समजून जा गड्या तो

संकेत आहे प्रेमाचा।

 

सुटलेल्या पोटावर ताशेरे

टकलावर रोजच इशारे

जेंव्हा ती बोलेल कानात

रुबाबदार दिसतोस राजा

समजून जा गड्या तो

संकेत आहे प्रेमाचा।

 

विलास कुलकर्णी

मीरा रोड

१९.२.२०१८

प्रतिक्रिया व्यक्त करा