*कोमसाप मालवण शाखाध्यक्ष सुरेश ठाकूर यांचा अनोखा अंदाज*
सावंतवाडी :
सावंतवाडी येथे २२ मार्च २०२५ रोजी कोकण मराठी साहित्य परिषद परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन दिमाखात संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनात कोमसापचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांसह संमेलनाध्यक्ष वस्त्रहरणकार श्री.गंगाराम गवाणकर यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी जिल्हाभरातील साहित्यिक आणि साहित्य रसिक सहभागी होणार आहेत. सावंतवाडीत होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांना व साहित्यिकांना अनोखी मानवंदना देण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखा एक आगळावेगळा उपक्रम सादर करणार आहे.
“फिरते कविसंमेलन – २०२५”* अंतर्गत ‘आचरा ते सावंतवाडी’ या प्रवासादरम्यान बसमध्ये तब्बल वीस कवी आपल्या दर्जेदार कवितांचे सादरीकरण करणार आहेत. या फिरत्या कवी संमेलनाची निर्मिती कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण शाखेचे उपक्रमशील अध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजी यांची असून या संमेलनाचे निवेदक कवी रामचंद्र कुबल आहेत. ध्वनी व्यवस्था सुरेंद्र सकपाळ, बैठक नियोजन पांडुरंग कोचरेकर तर चित्रीकरण गुरुनाथ ताम्हणकर करणार आहेत.
साहित्य रुजवणे आणि नवीन साहित्यिक निर्माण करणे आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या शिलेदारांना अनोखी मानवंदना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सुरेश ठाकूर यांनी सांगितले.
‘हे’ कवी करणार कवितांचे सादरीकरण –
या कवी संमेलनात तब्बल वीस कवी कवितांचे सादरीकरण करणार आहेत. यात
१) सुरेश ठाकूर –
२) गुरुनाथ ताम्हणकर –
३) सदानंद कांबळी –
४) पांडुरंग कोचरेकर –
५) श्रुती गोगटे –
६) अर्चना कोदे –
७) रामचंद्र कुबल –
८) सुरेंद्र सकपाळ –
९) विठ्ठल लाकम-
१०) सायली परब –
११) संजय परब –
१२) महेश चव्हाण –
१३) नारायण धुरी –
१४) सुगंधा गुरव –
१५) मंदार सांबारी –
१६) रमाकांत गोविंद शेट्ये –
१७) विनोद कदम –
१८) अनघा कदम –
१९) विनय वझे –
२०) मधुरा वझे
या कवी व कवयित्रींचा समावेश आहे.