सावंतवाडी :
पुणे येथील जी.एच.रायसोनी काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट यांनी आयोजित केलेल्या रायसोनी स्पोर्ट्स कार्निव्हल 2025 मधील बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने विजेतेपद पटकावले.या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामांकित काॅलेजच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री.सुनील रायसोनी आणि रायसोनी एज्युकेशन आणि जी.एच.रायसोनी काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी, क्रिडा डायरेक्टर डाॅ.निशिगंधा पाटील,इ. मान्यवरांच्या हस्ते बाळकृष्णला रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
बाळकृष्ण हा सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांचा मुलगा आहे. बाळकृष्ण जिल्ह्यातील टाॅप रेटेड खेळाडू असून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धांमधील पारितोषिक प्राप्त खेळाडू आहे.