हिंदूधर्माभिमानी’ वेंगुर्ला तर्फे ढीपाडवा व नववर्ष स्वागताच्या निमित्ताने वेशभूषा व अभिनय सादरीकरण स्पर्धेचे आयोजन
वेंगुर्ला
हिंदुधर्माभिमानी, वेंगुर्ला आयोजित गुढीपाडवा व हिंदू नववर्ष स्वागताच्या निमित्ताने वेंगुर्ला तालुका मर्यादित शालेय विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन रविवार दि. ३० मार्च २०२५ रोजी (तिथी चैत्र शक १९४७, गुढीपाडवा) श्री रामेश्वर मंदिर, वेंगुर्ला येथे दुपारी ०३.०० वा. आयोजित करण्यात आलेली आहे. शुद्ध प्रतिपदा, यावेळी हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रेचे सुद्धा आयोजन केले आहे. तरी या शोभायात्रेत आणि वेशभूषा स्पर्धेत मुलांना सहभागी करून सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे
स्पर्धेची माहिती व पारितोषिके पुढीलप्रमाणे-
लहान गट – इयत्ता पहिली ते पाचवी विषय ऐतिहासिक व संत परंपरा
–
प्रथम क्रमांक – रोख रक्कम ७००, चषक व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक – रोख रक्कम ५००, चषक व प्रमाणपत्र तृतीय क्रमांक – रोख रक्कम ३००, चषक व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ क्रमांक – रोख रक्कम २००, चषक व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ क्रमांक – रोख रक्कम २००, चषक व प्रमाणपत्र
मोठ गट – इयत्ता सहावी ते दहावी विषय – रामायण व महाभारतमधील व्यक्तिरेखा
प्रथम क्रमांक – रोख रक्कम १०००, चषक व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक – रोख रक्कम ७००, चषक व प्रमाणपत्र तृतीय क्रमांक – रोख रक्कम ५०० चषक व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ क्रमांक – रोख रक्कम ३००, चषक व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ क्रमांक – रोख रक्कम ३००, चषक व प्रमाणपत्र नियमावली
–
१) नोंदणीची अंतिम तारीख २८ मार्च २०२५ पर्यंत राहील.
२) दोन्ही गटांसाठी सादरीकरण कालावधी कमाल २ मिनिटे राहिल.
३) स्पर्धकांनी येताना शाळेचे ओळखपत्र कार्यक्रमस्थळी घेऊन येणे अनिवार्य आहे.
४) मोठ्या गटातील स्पर्धकांनी दुपारी ठिक २.५० वा. व लहान गटातील स्पर्धकांनी दुपारी ठिक ०३.३० वा. स्पर्धेसाठी रामेश्वर मंदिर, वेंगुर्ला येथे उपस्थित रहावे.
५) सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्राने गौरविण्यात येईल.
संपर्क
श्री.विनीत म.परब 8956794853
श्री. डॉ. सचिन परुळकर 9421238053