*न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश*
*सावंतवाडी*
न्हावेली गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, आमदार दीपकभाई केसरकर व शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळावा यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमावेळी हा प्रवेश केला. दरम्यान, अक्षय पार्सेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा शिवसेनेत योग्य तो सन्मान केला जाईल, असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रवेशावेळी अक्षय यांचे सहकारी राज धवन, नवनाथ पार्सेकर, प्रथमेश नाईक, विठ्ठल परब, राकेश न्हावेलकर, अमोल पार्सेकर, अनिकेत धवन, पुनीत नाईक, तुकाराम पार्सेकर, धनेश नाईक, ओंकार न्हावेलकर, दत्तप्रसाद पार्सेकर, चेतन पार्सेकर आदी उपस्थित होते.
